esakal | शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस गुलाबराव कन्हेरकर यांचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस गुलाबराव कन्हेरकर यांचे निधन

भादलवाडी (ता. इंदापुर) येथील शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस गुलाबराव सुखदेव कन्हेरकर (वय. ८२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस गुलाबराव कन्हेरकर यांचे निधन

sakal_logo
By
प्रा. प्रशांत चवरे

भिगवण : भादलवाडी (ता. इंदापुर) येथील शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस गुलाबराव सुखदेव कन्हेरकर (वय. ८२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कन्हेरकर यांनी खडकवासला कालव्याचे पाणी, ऊसाला एफ.आर.पी., शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिट आदींसाठी मोठा संघर्ष केला होता. कन्हेरकर यांच्या निधनाने शेतकरी संघटनेचा अभ्यासू व लढवय्या नेता हरपला अशी भावना शेतकऱ्यांमधुन व्यक्त होत आहे.

भादलवाडी (ता. इंदापुर) येथील शेतकरी कुटुंबातील गुलाबराव कन्हेरकर यांनी सहकार खात्यांमध्ये प्रथम श्रेणी सहकार अधिकारी म्हणुन ३६ वर्षे सेवा केली होती. १९९७ साली सहकार खात्यातुन सेवानिवृत्तीनंतर त्यांनी सहकार खात्यातील अनुभवाचा उपयोग करुन इंदापुर तालुक्यामध्ये अनेक सहकारी 
दुधसंस्था, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटया, सहकारी पाणी वापर संस्था, ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था निर्माण करण्यात महत्वपुर्ण भुमिका निभावली.

बार, हॉटेलचालकांनो, आता नियम मोडू नका नाहीतर... 

२०१० मध्ये शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांचे विनंतीवरुन शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस म्हणुन त्यांनी धुरा सांभाळली. पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकणात शेतकरी संघटना वाढीसाठी त्यांनी महत्वपुर्ण योगदान दिले. ऊसासाठी एफ.आर.पी., शेतीमालास आधारभुत किंमत, शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिट यासाठी त्यांनी संघर्ष केला. इंदापुर तालुक्यातील शेतकऱ्यांना खडकवासला धरणातील पाण्यासाठी त्यांनी रस्त्यावर व कोर्टाच्या माध्यमातून लढा दिला.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सहकारातील अनुभवाच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांचे जीवन समृध्द करणारा व शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अभ्यासपुर्ण पध्दतीने लढा उभारणारा लढवय्या नेता हरपला अशी भावना शेतकऱ्यांमधुन व्यक्त होत आहे.

loading image