राजगडावर मधमाश्‍यांचा पर्यटकांवर हल्ला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 डिसेंबर 2017

गुंजवणे - वेल्हे तालुक्‍यातील राजगड किल्ल्यावर काही पर्यटकांवर मधमाश्‍यांनी हल्ला केला. मधमाश्‍यांनी चावे घेतल्याने चार पर्यटक गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी पर्यटकांची धावपळ पाहून किल्ल्यावर धाव घेतली. जखमी झालेल्या ‘नेचर लव्हर्स’च्या पर्यटकांना झोळीतून पायथ्याशी आणून पुढील उपचारासाठी करंजावणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. सध्या जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी आर. पी. नांदेडकर यांनी सांगितले. 

मुंबई मालाड येथील ‘नेचर लव्हर्स’ नावाच्या संस्थेमार्फत गेल्या ३२ वर्षांपासून दरवर्षी २३ ते २६ डिसेंबर या कालावधीत राजगड किल्ल्यावर उत्सव साजरा केला जातो. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी संस्थेचे १६० कार्यकर्ते वीस-वीसच्या आठ गटाने राजगडाला प्रदक्षिणा घालत असताना शेवटच्या गटामधील स्वप्नील मोहन जाधव (वय २४, रा. गोरेगाव, मुंबई), शंकर मारुती शेलार (वय २६, रा. भांडूप, मुंबई), पुरुषोत्तम लक्ष्मण कडलसकर (वय ५९, रा. कोथरूड, पुणे) यांच्यावर गुंजवणे चोर दरवाजाच्या बाजूने मधमाश्‍यांनी हल्ला चढविला. त्यात तिघेही गंभीर जखमी झाले. तसेच विनायक गुंडोपंत पटवर्धन (वय ६०, रा. बोरिवली, मुंबई) हे मधमाश्‍यांच्या हल्ल्याला घाबरून गडाच्या कपारीतून धावत सुटले. कपारीतून ते घसरून पडल्यामुळे गंभीर जखमी झाले.

Web Title: gunjavane pune news bee attack on tourist