गुंजवणी धरण पाणीपुरवठ्याचे पाईप वेल्ह्यात दाखल; धरणग्रस्तांच्या प्रश्नांचे घोंघडे भिजत 

Gunjawani dam water supply pipe filed in Velha
Gunjawani dam water supply pipe filed in Velha

वेल्हे(पुणे) : वेल्हे तालुक्यातील गुंजवणी धरणाचे पाणी हे बंद पाईपलाईन मधुन पुंरधर तालुक्यात नेणार असुन संबधित कामाला लागणारे पाईप वेल्हे तालुक्यात दोन दिवसांनपासुन दाखल होत असले तरी गुंजवणी धरण ग्रस्तांचे पुर्नवसन, तालुक्यातील वांगणी, वाजेघर खोरे उपसा सिंचन योजना कश्या पध्दतीने राबविणार.अशा एक ना अनेक प्रश्नांचे घोंघडे भिजत ठेवुन काम सुरु होणार असल्याच्या चर्चेने वेल्हेकरांनमध्ये संतापाचे वातावरण आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे 
 क्लिक करा

वेल्हे तालुक्यातील गुंजवणी धरण गेले काही वर्षे राजकारणाचे केंद्रबिंदु  ठरले आहे.अनेक वर्षे रखडलेला हा प्रकल्प पुर्ण झाला खरा परंतु पाणी पुरंदर तालुक्याला कशा पध्दतीने न्यायचे यावर वाद सुरु झाले.यानंतर भोर वेल्हे तालुक्यातील सर्वपक्षीय नेते एकत्र येत गुंजवणी कृती समिती स्थापन केली.

फडणवीस सरकारच्या काळात बंद पाईप लाईनने पाणी जाणार यावर शिक्का मोर्तब झाल्यानंतर गुंजवणी कृती समितीने याला कडाडुन विरोध करत बंद निविदेची होळी केली व विविध मार्गाने विरोध दर्शविला.त्यांनतर कृती समितीला विश्वासात घेवुन या वेल्हे, भोर, तालुक्यातील व शिवगंगा खो-यामधील टंचाईग्रस्त भागात पाणी फिरवण्यास (वाटप करण्यास) तत्वता मान्यता देण्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या बैठकीत ठरले. अखेर बंद पाईप लाईनची निविदा होऊन एक खाजगी कंपनीला ३१ ऑक्टोबर २०१९ ला वर्क ऑर्डर देण्यात आली व त्यानंतर मोजमाप होऊन वेल्हे तालुक्यात गेली दोन दिवसांपासुन मोठ्या प्रमाणात पाईप येत असून वांगणी व वाजेघर भागाबाबत पाणी वाटपाचे काय नियोजन केले आहे याबाबत अद्याप काही स्पष्ट केले नसल्याने  गुंजवणी धरणग्रस्तांचे व वेल्हेकरांचे प्रश्न निरुत्तर राहतात काय यामुळे वेल्हेकरांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. गुंजवणी संघर्ष समिती याबाबत काय भूमिका घेती याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गुंजवणी धरणाचा पाणीसाठ्याचे वाटप कसे व लाभक्षेत्र किती.
 
कुरकुंभमध्ये केमिकल कंपनीत भीषण आग; लागोपाठ स्फोटांनी परिसर हादरला

 गुंजवणी धरणामध्ये एकुण ३.६९ टी.एम.सी. पाणीसाठा 
१)वेल्हे तालुक्यासाठी ०.१२ टी.एम.सी,  पाणी तर ८५० हेक्टर लाभक्षेत्र 
२)भोर तालुक्यासाठी१.४० टी.एम.सी.पाणी तर ९४३५ हेक्टर लाभक्षेत्र
३) पुरंधरसाठी २.०२ टी.एम.सी पाणी तर १११०७ हेक्टर लाभक्षेत्र 


 गुंजवणी प्रकल्पग्रस्त व वेल्हेकरांच्या प्रमुख मागण्या काय  व जलसंपदा विभागाकडुन अद्यापही स्पष्ट उत्तर न मिळालेले प्रश्न खालीलप्रमाणे
१)  गुंजवणी धरणग्रस्तांचे १०० टक्के पुर्नवसन कधी होणार?
२) वेल्हे तालुक्यातील वांगणी व वाजेघर परिसरासाठी उपसा सिंचन योजने कशी राबविणार?
३) गुंजवणी नदीच्या पाण्यावर शेकडो एकर शेती व अनेक गावच्या पाणीपुरवठा योजना अवलंबुन आहेत यानदीपात्रामध्ये पाणी सोडण्याचे कसे नियोजन केले आहे?
४) बंद पाईपलाईन नेताना शेतक-यांच्या होणारी नुकसान भरपाई कशी देणार?
 ५) सर्वात जास्त टि.एम.सी पाणी व लाभक्षेत्र असताना पुरंधरमध्ये गुंजवणी प्रकल्पाग्रस्तासाठी एकही गुंठा जमीन संपादित का केली नाही.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com