दापोडीत बसविणार गर्डर लाँचर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

पिंपरी - दापोडीत मेट्रो व्हायाडक्‍टच्या दोन स्पॅनवर गर्डर लाँचर बसविण्यात येत असून, त्याच्या आधारे व्हायाडक्‍टचे काम वेगाने सुरू होईल. नाशिक फाटा येथील मेट्रो स्थानकाच्या प्रारंभिक कामालाही सुरवात झाली आहे.

पिंपरी - दापोडीत मेट्रो व्हायाडक्‍टच्या दोन स्पॅनवर गर्डर लाँचर बसविण्यात येत असून, त्याच्या आधारे व्हायाडक्‍टचे काम वेगाने सुरू होईल. नाशिक फाटा येथील मेट्रो स्थानकाच्या प्रारंभिक कामालाही सुरवात झाली आहे.

खराळवाडीतील गर्डर लाँचर बसविल्यानंतर तेथील १८ स्पॅन पूर्ण झाले आहेत. खराळवाडीकडून वल्लभनगरच्या दिशेने व्हायाडक्‍टचे काम सुरू आहे. वल्लभनगर एसटी बस स्थानकासमोर मेट्रोचे संत तुकारामनगर स्थानक बांधण्यात येत असून, त्याचे दहा खांब उभारले आहेत. त्याच्या पहिल्या टप्प्यासाठी या प्रत्येक खांबावर दोन्ही बाजूला आर्म्स बसविण्यात येत असून, पहिला आर्म बसविला आहे. दुसरा आर्म बसविण्याचे काम महामेट्रोने हाती घेतले आहे. 

फुगेवाडी ते दापोडीदरम्यानच्या खांबांवर कॅप बसविण्याच्या कामाला गती आली आहे. दापोडीकडून फुगेवाडीच्या दिशेने व्हायाडक्‍टचे काम सुरू करण्याची प्राथमिक तयारी करण्यात येत आहे. त्यासाठी दापोडीला अरुण चित्रपटगृहासमोरील तीन खांबांवर गेल्या पंधरवड्यात दोन स्पॅनचे काम पूर्ण करण्यात आले. त्यावर गर्डर लाँचर बसविल्यानंतर तेथे स्पॅन उभारणीच्या कामाला गती येईल. 

नाशिक फाटा येथे कासारवाडी रेल्वे स्थानकासमोर मेट्रोचे स्थानक उभारण्यात येईल. या स्थानकाच्या तीन खांबांच्या फाउंडेशनसाठी पायलिंगचे काम पूर्ण झाले. पुण्याकडून पिंपरीकडे येताना नाशिक फाटा येथील पुलाजवळ मायक्रोपायलिंगचे काम महामेट्रोतर्फे करण्यात येत आहे. त्यामुळे पुलाला आधार मिळणार आहे. त्यानंतर तेथे खांबांच्या फाउंडेशनची कामे हाती घेण्यात येतील. नाशिकफाटा येथील दुहेरी पुलामुळे तेथे मेट्रो मार्गस्थ होताना वळून जाणार आहे. त्या ठिकाणी तीस खांब उभारण्यात येतील.

खराळवाडी व दापोडी येथून स्पॅन बसविण्याचे काम सुरू झाल्याने व्हायाडक्‍टच्या कामाला गती मिळणार आहे. संत तुकारामनगर मेट्रो स्थानकाजवळही सप्टेंबरमध्ये गर्डर लाँचर बसविण्यात येईल. त्यासाठी स्पॅनला लागणारे सेगमेंट बनविण्याचा वेगही वाढविला आहे. 
- गौतम बिऱ्हाडे, मुख्य प्रकल्प अधिकारी, महामेट्रो

खांबांसाठी फाउंडेशन १८४
खांब १३९
पिलर कॅप  ६२
स्पॅन २०
सेगमेंट ८०२

Web Title: Gurder Launcher in Dapodi metro