गुरू नानकजींचा  प्रकाशपर्व उत्साहात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

पिंपरी : "सत्‌गुरू नानक प्रगटिया, मिटी धुंध जग चानण होआ, ज्यूँ कर सूरज निकलया, तारे छुपे अंधेर पलोआ' गुरू नानक यांच्या जीवनावर आधारित भजनाचे बोल समाजबांधव शहरातील विविध गुरुद्वारांमध्ये तल्लीन व भक्तिभावाने श्रवण करत होते. "बोले सो निहाल, सत्‌ श्रीअकाल...'चा जयघोष, अखंडपाठ, कीर्तन व प्रवचनाच्या भक्तिमय वातावरणात समाजबांधवांनी माथा टेकवला. मानवजातीला प्रेमाचा संदेश देणाऱ्या गुरू नानकाजींच दर्शनासाठी पंजाबी, शीख व सिंधी बांधवांनी गुरुद्वारामध्ये गर्दी केली होती. निमित्त होते शहरातील गुरुद्वारामध्ये आयोजित गुरू नानकजी यांच्या जयंतीचे. 

गुरू नानकजींची 550 वी जयंती साजरी होत असल्याने शहरातील गुरुद्वारांमध्ये गेल्या 15 दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात अखंडपाठ, कीर्तन दरबार व लंगरचा समावेश होता. "प्रकाशपर्व' उत्सव असल्याने गुरुद्वाराचे अंतर्गत व बाह्य परिसराची फुलांनी सजावट केली होती. विद्युत रोषणाईने परिसर उजळून गेला होता. आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळील श्री वाहिगुरु गुरुनानक मानसरोवर आश्रम गुरुद्वारांमधील शीख बांधवांकडून पहाटे तीन ते सकाळी आठ या वेळेत शहरातील विविध ठिकाणी प्रभात फेरी काढण्यात आली. नगर कीर्तन झाले. जयंतीनिमित्त अमृतसर, सिमला, कोटला, दिल्ली, पटीयाला, जालंधर, हरिद्वार येथून आलेल्या भाईसाहिब जथ्था यांच्या कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध झाले. कीर्तनातून त्यांनी गुरू नानकजी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. गुरू नानक यांनी शीख धर्माची स्थापना करून अखंड मानवजातीला प्रेमाचा संदेश दिला. तसेच लंगर सेवेचा पाया त्यांनी रचला. तीच सेवा आज जगभरात सुरू असून अनेक गरजू घटक त्याचा लाभ घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

पिंपरी कॅम्पमधील श्री गुरू नानक दरबार गुरुद्वारात हजुरी जथा व रागाचे कीर्तनसाहीब यांनी कथा, प्रवचनातून गुरू नानक यांचा शिकवणीचा संदेश दिला. सकाळपासून "गुरू का लंगर'चा शहरातील भाविकांनी लाभ घेतला. बहुतांशी गुरुद्वारामध्ये भाविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guru nanak birth anniversary in pcmc