गुरूकुल संगीत वर्गाचा गुरूपौर्णिमा उत्सव साजरा

कृष्णकांत कोबल
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

पुणे - केवळ आयडॉलच्या स्पर्धेसाठी संगीत शिक्षण ही सांस्कृतिक क्षेत्रातील विकृती आहे. त्यासाठी गुरू-शिष्यांनी आपली संगीत परंपरा लक्षात घेतली पाहिजे. त्यातूनच अव्वल संगीत संस्कृतीला आपण खऱ्या अर्थाने पुढे नेऊ शकतो, असे मत संगीत शिक्षक नंदकुमार कोरे यांनी व्यक्त केले.

हडपसर येथील गुरूकुल संगीत वर्गाच्या विद्यार्थ्यांकडून विविध गितांचे सादरीकरण करून गुरूपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करताना श्री. कोरे बोलत होते. चंद्रमौलेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंद्रकांत मगर, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब मगर, तबला शिक्षक रामचंद्र पवार, प्रा. नितीन लगड, प्रमोद गिरी, राजेंद्र माने आदी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

विद्यार्थ्यांनी यावेळी विविध प्रकारची बालगिते, भावगीते, भक्तिगीते तसेच विविध रागांवर आधारित हिंदी मराठी गिते सादर केली. चंद्रकांत  मगर म्हणाले, "हडपसर परिसरातील कलाकारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही आनंदाची बाब असून या कलाकारांना चंद्रमौलेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल.' पापाभाई बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली तबला वादक संदीश शिंदेकर, ढोलक रामकृष्ण घबाडे, गिटार गणेश तारु, सिंथेसायझट सुनिल साळवे वादक कलाकारांनी त्यांना संगीत दिले.

रश्मी शिरडकर, सुचिता कत्ते यांनी सूत्रसंचालन केले. हर्षदा राउत, राजशेखर कत्ते, नरेश निवळ, शशांक वाघमारे, सचिन भांडवलकर, सागर पाटील, प्रवीण रायबोले यांनी संयोजन केले.

Web Title: Gurukul music festival celebrates Guruparnarnima festival