गुरूराज सोसायटीतील रहिवाश्यांवर यंदाही पुराच्या संकटाची टांगती तलवार; कारण...

ambil odha1.jpg
ambil odha1.jpg

बिबवेवाडी (पुणे) : एकिकडे कोरोना तर दुसरीकडे वरूणराजाची भीती गुरूराज सोसायटीतील नागरिकांना सतावत आहे. मागील वर्षीच्या पावसाच्या आठवणी ताज्या असताना आता पुन्हा येणाऱ्या पावसामुळे येथील रहिवाशांची झोपच गायब झाली आहे. पुरामुळे सोसायटीच्या कोसळलेल्या सीमाभींतीची प्रशासनाकडून अद्याप दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे भीतीच्या सावटाखाली येथील रहिवासी जीवन जगत आहेत. 

सातारा रस्त्यावरील गुरूराज सोसायटीत १८ इमारती असून २७६ सदनिका आहेत. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात आंबील ओढ्याला आलेल्या पुरात सोसायटीची सीमाभिंत कोसळली होती आणि काही इमारतींच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी आले होते. तसेच, काहींनी सदनिकाही सोडल्या होत्या. आठ महिन्यांपूर्वी कोसळलेली सीमाभिंत अद्याप बांधलेली नाही.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सीमाभिंत बांधून देण्यासंदर्भात राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याचे आश्वासन येथील नागरिकांना दिले होते. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे केवळ ३३ टक्केच कामांना परवानगी मिळालेली असून सोसायट्यांनी सीमीभिंतीची कामे स्वंयखर्चातून केली पाहीजे असे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर, पुराच्या पाण्यामुळे तीन इमारतींच्या पायाला तडे गेले असल्याने त्याचे काम सोसायटी स्वंयखर्चातून करत आहे. तसेच, सोसायटी जुनी असल्यामुळे देखभाल दुरुस्ती खर्च मर्यादीत आहे. त्यामुळे सीमाभिंतीचे काम करण्यास निधी उपलब्ध नसल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे. ही सीमाभिंत दुरूस्त करणे आवश्यक असल्याने प्रशासनाने ती लवकर बांधून द्यावी अशी येथील रहिवाशांची मागणी आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा



सीमाभिंतीचे काम सोसायटी करू शकत नाही. तत्कालीन आयुक्त व महापौरांनी दिलेल्या आश्वासनानुसार सीमाभिंतीचे काम होणे अपेक्षित आहे. 
- चंद्रकांत आलाटे, स्थानिक 

 

प्रशासनाने ओढ्यातील मलवाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे सुरु केलेली असून, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे केवळ ३३ टक्केच विकासकामांना परवानगी मिळालेली आहे. त्यामुळे सोसायट्यांनी सीमीभिंतीची कामे स्वंयखर्चातून केली पाहिजे. 
- प्रविण गेडाम, अधिक्षक अभियंता, मलनिसारण विभाग 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com