esakal | दौंड शहरात सात लाख रूपयांचा गुटखा जप्त

बोलून बातमी शोधा

crime
दौंड शहरात सात लाख रूपयांचा गुटखा जप्त
sakal_logo
By
प्रफुल्ल भंडारी

दौंड : दौंड पोलिसांनी केलेल्या कारवाईत सात लाख रूपयांचा गुटखा व सिगारेटचा साठा जप्त करण्यात आला आहे. संचारबंदीत या गुटख्याचा साठा करून त्याची विक्री केल्याप्रकरणी एका तरूणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दौंड पोलिस ठाण्याचे फौजदार भगवान पालवे यांनी या बाबत माहिती दिली. परिविक्षाधीन पोलिस उप अधीक्षक मयूर भूजबळ यांनी पोलिस पथकासह १९ एप्रिल रोजी ही कारवाई केली.

हेही वाचा: जुन्नर : वैरणीला आग लागल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान

कमलेश मुरली कृपलानी ( वय ३४, रा.दौंड) या दुकानदाराने श्री भैरवनाथ मंदिराजवळ एका गाळ्यात गुटखा आणि विदेशी सिगारेटचा साठा केला होता. पोलिस पथकाने तेथे छापा टाकून एकूण सात लाख रूपयांचा गुटखा, सुपारी, पान मसाला, सुगंधी सुपारी, तंबाखू, सिगारेट, आदी जप्त केले. कमलेश कृपलानी याच्याविरूध्द भारतीय दंड विधान कलम १८८ ( संचारबंदी आदेशाची अवज्ञा करणे ), कलम २६९ ( संसर्गजन्य रोग पसरवण्याचा संभव असलेली कृती करणे ), कलम २७२ ( विक्रीसाठी असलेल्या खाद्यपदार्थात भेसळ करणे), कलम २७३ ( अपायकारक खाद्यपदार्थाची विक्री करणे ), सिगारेट व तंबाखू उत्पादने संबंधी अधिनियम आणि अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: कोरोनामुळे ‘बाटली’ आडवी; पुणे जिल्ह्यातील 25 टक्के परमिट बार कायमचे बंद

पुणे ग्रामीण पोलिस दलाचे अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक मयूर भुजबळ, फौजदार भगवान पालवे, अंमलदार शरद वारे, किरण ढूके, विशाल जावळे, नीलेश काळे, जब्बार सय्यद व योगेश गोलांडे यांनी या कारवाईत भाग घेतला.