Gutkha truck seized two days ago Rajgad Police truck disappeared crime pune khed shivapur
Gutkha truck seized two days ago Rajgad Police truck disappeared crime pune khed shivapur esakal

Crime News : पोलिसांच्या ताब्यातील गुटख्याचा ट्रक पोलिस चौकी समोरून गायब

राजगड पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी पकडलेला गुटख्याचा ट्रक गुटख्यासह रविवारी पहाटे खेड-शिवापूर पोलिस चौकीसमोरून पळवून नेल्याचा प्रकार

खेड-शिवापूर : राजगड पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी पकडलेला गुटख्याचा ट्रक गुटख्यासह रविवारी पहाटे खेड-शिवापूर पोलिस चौकीसमोरून पळवून नेल्याचा प्रकार घडला आहे. पळवून नेलेला ट्रक रिकाम्या अवस्थेत शिंदेवाडी गावच्या हद्दीत मिळून आला आहे. मात्र पोलिसांच्या ताब्यातील गुटख्याचा ट्रक पळवून नेल्याने परीसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

Gutkha truck seized two days ago Rajgad Police truck disappeared crime pune khed shivapur
Pune Election: काँग्रेसच्या मर्मावर बोट ठेवत पुणे लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादीने केला दावा

राजगड पोलिसांनी खेड-शिवापूर टोल नाक्यावर गुरुवारी (ता.25) गुटख्याची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला होता. या ट्रकमधून सुमारे 70 लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला होता. याप्रकरणी अन्न औषध प्रशासन विभागाने फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला होता.

तर जप्त करण्यात आलेला गुटखा पंचनामा करून ट्रकमध्ये ठेवून ट्रक खेड-शिवापूर पोलिस चौकीसमोर उभा करण्यात आला होता. मात्र रविवारी पहाटे अज्ञातांनी खेड-शिवापूर पोलिस चौकीसमोर उभा असलेला हा ट्रक गुटख्यासह पळवून नेल्याचा प्रकार घडला. तर काही वेळाने हा ट्रक शिंदेवाडी गावच्या हद्दीत सापडला. मात्र त्यातील गुटखा हा चोरट्यांनी लंपास केला आहे.

Gutkha truck seized two days ago Rajgad Police truck disappeared crime pune khed shivapur
Pune : आंबेगाव तालुका पंचायत समिती गटविकास अधिकारी म्हणून प्रमिला वाळुंज पाटील यांनी पदभार स्वीकारला

पळवून नेलेला गुटखा आणि आरोपींच्या शोधासाठी राजगड पोलिसांचे पथक पाठविण्यात आले आहे. मात्र पोलिसांच्या ताब्यात असलेला गुटख्याचा ट्रक खेड-शिवापूर पोलिस चौकीसमोरून पळवून नेल्याने पोलिसांविषयी परीसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. याबाबत राजगडचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील म्हणाले, "पळवून नेलेला ट्रक मिळाला असून त्यातील गुटख्याचा आम्ही शोध घेत आहेत. लवकरच पळवून नेलेल्या गुटख्याचाही तपास लागेल."

यापूर्वी कारवाई केलेला गुटखा पोलिस चौक्यांमध्ये पडून

राजगड पोलिसांनी यापूर्वी अनेकदा कारवाई केलेला गुटखा शिंदेवाडी आणि खेड शिवापूर पोलिस चौक्यांमध्ये पडून आहे. या गुटख्याची विल्हेवाट लावण्याचा न्यायालयाचा आदेश येत नसल्याने हा गुटखा तसाच पडून आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com