पुणे - दापोडीत परिसरात नाले सफाईस सुरूवात

रमेश मोरे
शुक्रवार, 1 जून 2018

जुनी सांगवी (पुणे) : दापोडी येथील प्रभाग क्रं. 30 मधील फुगेवाडी, कासारवाडी येथील नाल्यांची सफाई कामास महापालिकेच्या आरोग्य विभागाकडुन सुरूवात  करण्यात आली आहे.

कासारवाडीतील शेवाळे पार्क, दापोडीतील गुलाबनगर, रेल्वेलाईन परिसर, लिंभोरे वस्ती, काटे वस्ती, सिध्दार्थनगर आदि ठिकाणी नाले सफाईचे काम सुरु करण्यात आले आहे. यावेळी नगरसेविका स्वाती (माई) काटे यांनी आरोग्य विभागाच्या अधिकार्यांसह कामाची पाहणी केली. आरोग्य अधिकारी सुनील चौहान, आनंद फंड, रवी कांबळे, तानाजी केदारी,  शिल्पा बिडकर, प्रभाग अध्यक्षा उषा पवार आदी उपस्थित होत्या.

नाल्यांमध्ये निरुपयोगी गवत, प्लॅस्टिक कागद, कचरा अडकला होता. या अडकलेल्या कचऱ्यांमुळे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले होते. तसेच विषारी सापांची वर्दळ वाढली होती. पावसाळ्यात नाले तुंबल्याने घरात पाणी शिरण्याचे प्रकार नेहमीच घडतात. त्यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून महापालिकेच्या वतीने  जेसीबीच्या सहाय्याने नाल्यातील वाढलेले गवत, प्लॅस्टिक कचरा काढण्यात आला. नाले स्वच्छ होत नाहीत, तोपर्यंत सफाईचे काम चालु राहणार आहे.

Web Title: gutters cleaning in dapodi pune