...तर जिमची ‘हेल्थ’ पुन्हा बिघडेल 

Gym
Gym

लॉकडाउनच्या अफवांमुळे चालकांना धडकी; सदस्य ६० टक्क्यांनी घटले
पुणे - गेल्या वर्षी लॉकडाउन काळात आठ महिने जिम व्यवसाय बंद होता. जिम सुरू होऊन चार महिने देखील उलटले नाहीत. त्यात जिममध्ये जाणाऱ्यांची संख्या सुमारे ६० टक्क्यांनी कमी झाली आहे. मेंबरशिपचे प्रमाण घटल्यामुळे व्यवसाय कसा सुरू ठेवायचा या चिंतेत असलेल्या जिम चालकांना आता पुन्हा लॉकडाउनची धडकी भरली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे पुन्हा लॉकडाउन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, तसे झाल्यास जिमची ‘हेल्थ’ पुन्हा बिघडेल आणि आमची आर्थिक परिस्थिती आणखी खालावेल, अशी चिंता व्यावसायिक व्यक्त करीत आहेत. जिम पुन्हा सुरू करण्याची परवानगी मिळाल्यापासून आतापर्यंत व्यवसायाला अपेक्षित प्रतिसाद नाही. जिमला येणाऱ्यांच्या सुरक्षिततेचा भाग म्हणून सर्व खबरदारी घेत असून त्यासाठी लागणारा खर्चही वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने संसर्ग नियंत्रित करण्यासाठी परत लॉकडाउनचा पर्याय निवडू नये, अशी विनंती जिमचालकांकडून करण्यात येत आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रशासनाने दिलेल्या खबरदारीच्या सूचनांचे आम्ही काटेकोरपणे पालन करीत आहोत. त्यामुळे आता लॉकडाउन नकोच. शहरात तीन हजारांहून अधिक जिम आहेत; परंतु अजूनही व्यवसायाला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत नाही. तर, नवनवीन ऑफर देत सध्या लोकांना जिममध्ये आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. पूर्वी वर्षभराची मेंबरशिप घेतली जात होती. मात्र, आता एक महिन्याच्या मेंबरशिपसाठी पण लोकांची संख्या घटत आहे.
- नीलेश काळे, अध्यक्ष, पुणे फिटनेस क्लब असोसिएशन

मागील वर्षी सुमारे नऊ महिने उत्पन्न नसल्यामुळे आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. लॉकडाउन शिथिल झाल्यावरही व्यायामासाठी येणाऱ्यांची संख्या म्हणावी तशी नाही. पूर्वी १५० ते २०० फिटनेसप्रेमी दररोज जिमला येत होते. मात्र, आता तो आकडा ५० ते ६० वर आला आहे. त्यामुळे भाडे आणि इतर खर्च भागविणे अवघड झाले आहे. पुन्हा लॉकडाउन केल्यास व्यवसाय बंद करण्याची वेळ येऊ शकते.
- सागर गोदमगावे, जिमचालक

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com