पोलिसांसाठी व्यायामशाळा अन्‌ शॉपिंगसाठी कॅंटीनही 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

पुणे - पोलिस कर्मचाऱ्यांसाठी अद्ययावत व्यायामशाळा... पोलिस आणि त्यांच्या कुटुंबीयांना शॉपिंगसाठी प्रशस्त अनुदानित कॅंटीन... नवनियुक्‍त आणि प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचाऱ्यांसाठी मेस... महिला पोलिसांसाठी निवासाची व्यवस्था... कौशल्य विकास केंद्र... ग्रंथालय अन्‌ लहान मुलांसाठी पाळणाघर अशा विविध सुविधा आता शिवाजीनगर पोलिस मुख्यालय आणि परिसरात उभारलेल्या हिरकणी बहुउद्देशीय संकुलात उपलब्ध होणार आहेत. 

या हिरकणी बहुउद्देशीय संकुलासह विविध अद्ययावत सुविधांचा प्रारंभ पोलिस महासंचालक सतीश माथूर यांच्या हस्ते मंगळवारी झाला. पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला, राज्य गुन्हे अन्वेषणचे (सीआयडी) अतिरिक्‍त पोलिस महासंचालक संजय कुमार, संजीवकुमार सिंघल, बिनतारी संदेशचे अतिरिक्‍त महासंचालक रितेश कुमार, विशेष पोलिस महानिरीक्षक (सीआयडी) सुनील रामानंद, विशेष पोलिस महानिरीक्षक (प्रशासन) अर्चना त्यागी, विशेष महानिरीक्षक सुरेश मेखला, विशेष महानिरीक्षक (परिवहन) फत्तेसिंह पाटील, पोलिस सहआयुक्‍त रवींद्र कदम, अतिरिक्‍त आयुक्‍त शशिकांत शिंदे, प्रदीप देशपांडे, पोलिस उपायुक्‍त अरविंद चावरिया, शेषराव सूर्यवंशी, दीपक साकोरे, श्रीकांत पाठक, पी. आर. पाटील, सुधीर हिरेमठ, पंकज डहाणे, गणेश शिंदे, डॉ. बसवराज तेली यांच्यासह अन्य अधिकारी या वेळी उपस्थित होते. 

हिरकणी बहुउद्देशीय संकुल चारमजली इमारतीमध्ये उभारण्यात येत असून, त्यापैकी दोन मजल्यांचे काम पूर्ण झाले आहे. या ठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पोलिस महासंचालक माथूर यांनी उद्‌घाटनानंतर तेथील सुविधा पाहून समाधान व्यक्‍त केले. 

Web Title: Gymnasium for police and canteen for shopping