पिंपरी : एच. ए. कंपनीचे योद्धाही राबताहेत

hA.jpg
hA.jpg


पिंपरी :'स्ट्रेप्टोसायक्लीन' हे शेतीसाठी उपयुक्त असणारे व शेतकऱ्यांच्या पसंतीचे प्रभावी व आंतरप्रवाही असे जीवाणुनाशक प्रतिजैविक असून विविध पिकांसाठी या उत्पादनाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.  मात्र, कोरोनासंसर्गातही पिंपरीतील हिंदुस्थान अँटिबायोटिक कंपनीतून शेतीसाठी लागणाऱ्या औषधांचा पुरवठा अखंड सुरू आहे. त्यासाठी अनेक हात राबत आहेत.

द्राक्षे, डाळिंब, मिरची, टोमॅटो, काकडी, कांदा, वांगी, कापूस , भात, बटाटे, लिंबूवर्गीय फळे, सोयाबीन, केळी, आंबा, सफरचंद, नारळ, सुपारी व मका यासाठी हे औषध वापरले जात आहे.

दरम्यान, पानांवरील डाग, करपा, पातीवरील मर घालून फवारणी करण्यासाठी उपयुक्त आहे. तसेच बियाणावर प्रक्रिया व  रोपे बुडून ठेवण्यासाठी हे कीटकनाशक उपयुक्त आहे. 'स्ट्रेप्टोसायक्लीन' प्रतिजैविक हे अनेक पिकांच्या जीवणूजन्य रोगांच्या बंदोबस्तासाठी आहे.  रोगप्रतिकारक व रोगप्रतिबंधक दोन्हीसाठी महत्वाचे आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

त्याव्यतिरिक्त गेल्या दोन महिन्यांपासून पीपीई किट, सॅनिटायझर, व औषध निर्मिती सह कृषी उत्पादन, वितरण हे विभाग देखील आपली भूमिका बजावत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com