एचए जमिनीचा प्रस्ताव मान्यतेच्या प्रतीक्षेत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

पिंपरी - भविष्यनिर्वाह निधी विभाग (पीएफ) कार्यालयाने हिंदुस्तान अँटिबायोटिक्‍स कंपनी (एचए) कडे मागणी केलेल्या साडेतीन एकर जमिनीचा प्रस्ताव अद्याप पीएफच्या दिल्लीतील मुख्य कार्यालयाकडे मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. केंद्रीय बोर्डाने हिरवा कंदील दिल्यानंतर तीन महिन्यांत त्यावर निर्णय होण्याची शक्‍यता आहे. 

एचएच्या आवारात पीएफची पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील कार्यालये एकत्रित आणण्याचा विचार आहे. याच ठिकाणी कर्मचाऱ्यांसाठी निवासाची व्यवस्था उभारण्याचेही नियोजन आहे. या प्रस्तावाबाबत काही शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. महिनाभरापूर्वी केंद्रीय कामगार सचिव पुणे भेटीवर असताना यासंदर्भात चर्चा झाली होती. 

दरम्यान, एचएकडे असणाऱ्या ८७ एकर मोकळ्या जमिनीचा लिलाव करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती. 

मात्र, त्यासाठी राबवण्यात आलेल्या लिलाव प्रक्रियेत कोणत्याही सरकारी विभाग, कंपन्यांनी पुढाकार घेतला नव्हता. 

पीएफ विभागाच्या स्थापत्य अभियंत्यांनी नुकतीच या जागेची पाहणी करून सविस्तर अहवाल दिला आहे, असे क्षेत्रीय आयुक्‍त अमिताभ प्रकाश यांनी सांगितले.

Web Title: HA Land Proposal permission