हडपसर - रेल्वे क्रॅासिंगवरील गेट टॅंकरच्या धडकेमुळे तुटले

संदीप जगदाळे
शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2018

हडपसर - ससाणेनगर-सय्यदनगर रेल्वे क्रॅासिंगवरील गेट टॅंकरच्या धडकेमुळे तुटले. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली. ऐन परिक्षेच्या कालावधीत गेट निकामी झाल्याने विद्यार्थ्यांची चांगलीच धांदल उडाली. कामावर जाणा-या कामगरांना वाहतूक कोंडीत अडकल्याने वेळेत पोहचता आले नाही.

दरम्यान, नगरसेवक योगेश ससाणे, शिवसेना प्रभाग प्रमुख शिवा शेवाळे व त्यांच्या मित्र परिवाराने तातडीने घडनास्थळी धाव घेतली व तुटलेले गेट बाजूला केले. त्यामुळे वाहतूक कोंडी सुरळीत होण्यास मदत झाली. 

नगरसेवक योगेश ससाणे म्हणाले, गेल्या वर्षभरात हे गेट चार वेळा तुटले. वारंवार गेट तुटत असल्यामुळे संबधित ठेकेदार, रेल्वे अधिकारी व स्थानिक आमदार योगेश टिळेकर यांच्यावर सदोष मुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार आहोत. आमदारांनी फार मोठा गाजावाजा करून 40 लक्ष रूपये राज्यशासनाच्या माध्यमातून टिळेकरांनी चुकीच्या पध्दतीने खर्च करून जनतेची लूट केली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hadapsar - Gate on railway crossing breaks down due to tanker