‘विकासाच्या बळावर पुन्हा सत्तेत येऊ’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

हडपसर - ‘‘हडपसर परिसरात (कै.) विठ्ठलराव तुपे यांना मानणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गेल्या १५ वर्षांत या भागात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. पक्षाने दिलेल्या उमेदवारांचा प्रचार प्रत्येक कार्यकर्ता प्रामाणिकणे करत आहे. विकासकामांच्या जोरावर प्रभाग २२ मधील पक्षाचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्‍याने निवडून येतील. तसेच पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महापौर महापालिकेत असेल,’’ असे प्रतिपादन माजी नगरसेवक शिवाजी पवार यांनी केले. 

प्रभाग क्र. २२ मध्ये पंधरा नंबर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती कचेरीचे उद्‌घाटन पवार यांच्या हस्ते झाले, याप्रसंगी पवार बोलत होते. 

याप्रसंगी प्रभाग क्र. २२ चे उमेदवार नगरसेवक चेतन तुपे, नगरसेविका चंचला कोद्रे, हेमलता नीलेश मगर, नगरसेवक बंडू ऊर्फ सुनील गायकवाड यांच्यासह नगरसेविका रंजना पवार, माजी महापौर नीलेश मगर, जयप्रकाश जाधव, नितीन बुवा तुपे, साकेत पवार, प्रदीप मगर, गजानन तुपे, मयूर तुपे, सविता मोरे, रामदास सावंत, नागेश दळवी, श्रीपाद कदम, शिवराज गायकवाड, अजित शेवाळे, महेंद्र शिळमकर, नीलेश जाधव, विक्रम जाधव, संजीवनी जाधव, प्रतिमा तुपे, बबन मगर, लहू मगर, आबा मारणे, नंदू मगर, अरुण मगर, अनिल मोरे, विक्रम जाधव, आबा जगताप, रज्जाक शेख, बासर गावकर, इम्तियाज मेमण, बंडू घुले, मनोज मगर, प्रवीण रासकर, राजू भोसले, तुषार घुले मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने चारही उमेदवारांना पाठिंबा दिल्याचे शहराध्यक्ष महंमद शेख यांनी जाहीर केले. दलाचे दत्ता कांबळे, अमिन शेख, अरुण गुरव, राजेंद्र सोणवणे आदी उपस्थित होते. 

जयप्रकाश जाधव म्हणाले, ‘‘पक्षाने चार जणांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सर्व मतभेद बाजूला ठेवून चारही उमेदवारांना निवडून आणू.’’ 

Web Title: hadapsar prabhag 22 ncp