वर्गणीसाठी दमदाटी नको - दीपक साकोरे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

हडपसर - दहीहंडी व गणेशोत्सव साजरा करताना समाजातील नागरिक व दुकानदारांना दमदाटी करून वर्गणी मागू नका. अशी घटना निर्दशनास आल्यास कायदेशीर गुन्हा दाखल केला जाईल. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव व दहीहंडी मंडळांनी सामाजिक व धार्मिक उपक्रमांसाठी स्वच्छेने वर्गणी घ्यावी, असे परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त दीपक साकोरे यांनी सांगितले.

वानवडी येथील जांभुळकर गार्डन येथे वानवडी सहायक आयुक्त कार्यालयाच्या वतीने येणाऱ्या दहीहंडी व गणेशोत्सवाविषयी मंडळांना मार्गदर्शन बैठकीत साकोरे बोलत होते. या प्रसंगी वानवडी विभागाचे सहायक पोलिस आयुक्त समीर शेख, वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सयाजी गवारे, हडपसरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू पवार, कोंढवा पोलिस निरीक्षक सतीश गोवेकर, मुंढवा पोलिस निरीक्षक ए. पी. पाथरूडकर, शांतता कमिटी सदस्य, पोलिसमित्र, महिला सुरक्षा व दक्षता समिती, ज्येष्ठ नागरिक व गणेश मंडळांचे अध्यक्ष, कार्यकर्ते उपस्थित होते.
साकोरे म्हणाले, ‘‘मंडळाने समाजप्रबोधनपर देखावे करण्याकडे भर दिला पाहिजे. जे मंडळ चांगले देखावे करेल, अशा मंडळांचा आम्ही पोलिस विभागाकडून सन्मान करणार आहोत. मंडळाच्या स्वयंसेवकांनी पोलिसांची भूमिका बजावावी; तसेच सामाजिक वातावरण बिघडणार नाही, याकडे लक्ष द्यावे.’’ या वेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या सूचनांचेदेखील त्यांनी स्वागत केले.

सुविधांची मदत घ्यावी
तात्काळ मदतीसाठी युवकांसाठी ‘पोलिस काका’ व महिलांसाठी ‘बडीकॉप’ या सुविधांची मदत घ्यावी; तसेच १०० नं,  punepolice.co.in या ट्‌विटरसारख्या सेवा उपलब्ध असून, त्याद्वारे पोलिसांची संपर्क साधावा. बालगुन्हे, महिला सुरक्षा प्रश्न, साखळी चोर अशा घटना घडू नयेत म्हणून कार्यकर्त्यांची मोलाची मदत लागणार असल्याने मंडळांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. 

Web Title: hadapsar pune news do not pressure for donation