पोतराजाचा आसूड मारत कचरा प्रकल्पाला विरोध

हडपसर - शिवसेनेच्या वतीने रामटेकडी कचरा प्रकल्पाच्या विरोधात रविवारी आंदोलन करण्यात आले.
हडपसर - शिवसेनेच्या वतीने रामटेकडी कचरा प्रकल्पाच्या विरोधात रविवारी आंदोलन करण्यात आले.

हडपसर - रामटेकडी कचरा प्रकल्पास अनेक वेळा विरोध करूनही महापालिका व राज्य सरकार दबाव आणून हडपसरला पाचवा कचरा प्रकल्प करू पाहत आहे. त्यामुळे कचरा प्रकल्पाच्या विरोधात शिवसेनेने पोतराजचा आसूड मारत महाजागर जनजागृती पदयात्रा काढून महापालिका व भाजप सरकारचा निषेध नोंदवला. यामध्ये हडपसर कचरा प्रकल्प हटाव कृती समितीनेही सहभाग घेतला.

एक ऑक्‍टोबरला हडपसर कचरा प्रकल्प हटाव कृती समितीने मोर्चाचे आयोजन केले आहे. त्याच्या जनजागृतीसाठी रविवार सकाळी अकरा वाजता ससाणेनगर रेल्वे क्रॉसिंग येथून पदयात्रा सुरू झाली. सासणे नगर मार्गे पदयात्रेचा समारोप गांधीचौक, हडपसर गाव येथे करण्यात आला. ‘सत्ताधाऱ्यांना सद्‌बुद्धी मिळो’, यासाठी गांधी चौक येथे आदिशक्तीचा जागर घालण्यात आला. पोतराज नाचत आसूड मारत तसेच हलगीच्या आवाजाने हडपसरवासीयांनी मोठी गर्दी केली होती. 

या पदयात्रेत शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर, हडपसर प्रभाग समितीचे अध्यक्ष योगेश ससाणे, जिल्हा उपाध्यक्ष अमोल हरपळे, नगरसेवक प्रमोद भानगिरे, नगरसेविका प्राची आल्हाट, संगीता ठोसर, माजी नगरसेवक विजय देशमुख, सतीश जगताप, के. टी. आरू, अभिमन्यू भानगिरे, अजय सपकाळ, विक्रम लोणकर, वीरभद्र गाभणे, सतीश कसबे आदी शिवसैनिक सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com