वडकीत वॉचमनकडून सुपरवायझरचा खून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 नोव्हेंबर 2017

हडपसर - वडकी येथील या सिक्‍युरिटी कंपनीच्या सुपरवायझरचा खून केल्या प्रकरणी स्ट्रोपॅक गोडाऊनमधील वॉचमनला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे.

मधुकर दशरथ धुमाळ (वय 45, रा. महादेवनगर, मांजरी, ता. हवेली) असे खून झालेल्याचे नाव आहे. संजय रामचंद्र औताडे (वय 24, रा. दहावा मैल वडकी, ता. हवेली) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

सहायक पोलिस निरीक्षक महानवर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वॉचमन संजय याचे काम समाधानकारक नव्हते. त्यामुळे सुपरवायझर धुमाळ नेहमीच "तुला कंपनीतून काढून टाकेल' अशी धमकी देत होता. याचा राग मनात धरून त्याने गोडाऊनवर सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास जाऊन "तू मला सारखा त्रास का देतो' अशी विचारणा करत सुपरवायझर धुमाळ यांच्या डोक्‍यात कोयत्याने वार केले. या घटनेत धुमाळ यांचा मृत्यू झाला. खून केल्यानंतर संजय फरारी झाला होता. उरुळी कांचन येथून त्याला ताब्यात घेऊन अटक केली.

Web Title: hadapsar pune news murder