धिम्या गतीने होणाऱ्या रस्त्याच्या कामाने नागरिक त्रस्त

संदीप जगदाळे
गुरुवार, 29 मार्च 2018

हडपसर - महापालिका पथविभागाच्यावतीने रवीदर्शन चौक ते गाडीतळ या रस्त्या दरम्यान रूंदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र ठेकेदाराने नियम धाब्यावर बसवित याठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिने उपाययोजना केल्या नाहीत. तसेच चालू असलेल्या कामाचा फलक नियमानुसार लावलेला नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी व अपघात होत आहेत. जिथे-जिथे रस्ते खणण्यात आले आहेत, तिथे तात्काळ काँक्रीट सिमेंटचा रस्ता करण्याची मागणी होत आहे. 

या रस्त्यालगत अनेक सोसायटया व व्यावसायीक दुकाने आहेत. त्यामुळे रत्याच्या धिम्या गतीने होणार्या कामाचा त्रास येथील रहिवाशी व ग्राहकांना होत आहे. जागोजागी रस्ते खोदून ठेवले आहेत. त्यामुळे संपूर्ण वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. रात्रीच्यावेळी सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना न केल्याने अपघात होत आहेत. तसेच रस्ता खोदाई केल्याने तो अरूंद झाला आहे. सतेच रस्त्याच्या कडेला वाहने देखीव लावलेली असतात. त्यामुळे पादचा-यांना मुख्य रस्त्यानेच जीव मुठीत घेवून चालावे लागत आहे.

याबाबत पथ विभागाचे कनिष्ठ अभियंता अमर शिंदे म्हणाले, रस्त्याचे काम आम्ही लवकरात लवकर पूर्ण करणार आहोत. संबधित ठेकेदाराला सुरक्षिततेच्या दृष्टिने आवश्यक त्या उपायोजना करण्याबाबत व पालिकेच्या नियमांचे पालन करण्याबाबत तातडीने सूचना देण्यात येतील. 

Web Title: hadapsar slow road work