स्वस्तात अमेरिकन डॉलर देण्याचे अमिश दाखवून गंडा घालणाऱ्या टोळीला अटक

स्वस्तात अमेरिकन डॉलर देण्याचे अमिश दाखवून गंडा घालणाऱ्या टोळीला अटक

हडपसर - पुणे शहरात वेगवेगळ्या भागात अमेरिकन डॉलर स्वस्तात देण्याचे अमिश दाखवून हातात कागदात साबणाचा बंडल देऊन अनेकांना लाखो रुपयाला गंडा घालणाऱ्या सराईत बांगलादेशी टोळीला हडपसर पोलिसांनी शिताफीने गजाआड केले. 

अटक करण्यात आलेल्या चौघांमध्ये नाहिद अमीन रहमान (वय २६ रा. देवेंद्र चंदा डे, टेंगरा कलकत्ता राज्य पश्चिम बंगाल), हाफीझूल उर्फ यामिन रुफिकूल सरदार (वय २३, गणरास पूर उत्तर २६, परगणा राज्य पश्चिम बंगाल), संमोन अतीयार खलिफा (वय ३१ रा. गाव शोलवा, शोरुक नगर, उत्तर २४ परगणा राज्य पश्चिम बंगाल), ओनिक फकरूल शेख (वय २९ रा. मूळ चटूग्राम, ठाणा, ढाका, बांगलादेश, कायम पत्ता ई ब्लॉक जे जे कॉलनी, भवाना, नॉर्थ वेस्ट दिल्ली) यांचा समावेश आहे. ही टोळी हडपसर गोंधळेनगर येथे ही टोळी हडपसर गोंधळेनगर येथील सचिन बधे यांचे घर राहत होती. 

हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल तांबे यांनी दिलेल्या माहिती नुसार, हडपसर गाव येथे काही महिन्यापूर्वी आरोपी हे सुरवातीला ओरिजनल अमेरीकन डॉलर देत, त्यानंतर सोमवारच्या व्यक्तीची खात्री पटल्यानंतर आमच्याकडे आणखी डॉलर आहेत. आम्हाला जमिनीच्या कामासाठी पैसे हवे आहेत. तुम्ही घ्याल का, असे म्हंटल्यानंतर फिर्यादिनी अति पैश्याच्या लोभा पोटी त्याच्याकडून डॅालर घेण्याचे कबुल करून त्यांना भारतीय रुपये देऊन त्याच्याकडून डॉलर चा बंडल घेतला होता. रोख भारतीय रुपयांचा बंडल हातात पडताच ते पळून गेले होते. अमेरीकन डॉलर चा बंडल उघडून पहिला तर त्यात साबणाच्या वड्या व कागद मिळून आल्याची फसवणूक केल्याची तक्रार नोंद करण्यात आली होती. त्यादिशेने तपास पथकातील पोलिसांनी शोध सुरू होता. तपास पथकातील पोलीस नितीन मुंडे व अकबर शेख यांना गोपनीय बातमीद्वारा माहिती मिळाली की अमेरिकन डॉलर देऊन फसवणारी टोळी हडपसर गाव सोनारअळी येथे येणार आहेत. त्यानुसार तपास उपनिरीक्षक मंगेश भांगे, पोलीस नाईक प्रताप गायकवाड, विनोद शिवले नितीन मुंडे, अकबर शेख, शशिकांत नाळे यांनी सापळा रचून पाच ही आरोपींना गजाआड केले. त्यांच्याकडून ओरिजनल १०४ अमेरिकन डॉलर्स, रुमाला मध्ये गंढाळलेला पेपरचा बंडल, २५ हजार रोख रक्कम व पाच मोबाइल असा एकूण ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींनी अश्याच प्रकारे दत्तावाडी पोलीस स्टेशनाच्या हद्दीत गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com