बारावीच्या विद्यार्थ्यांना शुक्रवारपासून मिळणार हॉल तिकिट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 जानेवारी 2019

पुणे : फेब्रुवारी-मार्च 2019मध्ये बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आता शुक्रवारपासून (ता.18) परीक्षेचे ऑनलाईन प्रवेशपत्र (हॉल तिकिट) मिळणार आहे. विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालये आणि उच्च माध्यमिक शाळांमार्फत ही प्रवेशपत्र दिली जाणार आहेत. 
 
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या "www.mahahsscboard.in' आणि "www.mahahsscboard.maharashtra.gov.in' या संकेतस्थळावर शुक्रवारपासून कॉलेज लॉगिनमध्ये जाऊन बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे डाऊनलोड करता येणार आहेत.

याबाबत काही तांत्रिक अडचण आल्यास विभागीय मंडळातर्फे संपर्क साधावा, असे मंडळातर्फे सांगण्यात आले आहे.

Web Title: Hall ticket will issue to HSC students from Friday