कधीपर्यंत घाबरून राहावे लागणार? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 मे 2017

पुणे - ""काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अनेक लेखकांना धर्माच्या नावाखाली दिल्या जाणाऱ्या धमक्‍यांना वेळोवेळी सामोरे जावे लागले आहे. कित्येकांना देश सोडून जावे लागले आहे. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपण्याचे धोके कधीपर्यंत सहन करावे लागणार आहेत?... धर्मातील चुकीच्या चालीरीतींना, अन्यायाला वाचा फोडणाऱ्यांना कधीपर्यंत घाबरून राहावे लागणार आहे?... हमीद दलवाईंनी जी धर्मचिकित्सा करू पाहिली, तशी पुन्हा एकदा  होण्याची गरज आहे,'' असे मत दलवाईंच्या पत्नी मेहरुन्निसा दलवाई यांनी व्यक्त केले. 

साप्ताहिक साधना आणि हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूटतर्फे दिला जाणारा "हमीद दलवाई स्मृती पुरस्कार' सामाजिक कार्यकर्ते इब्राहिम खान यांना बुधवारी देण्यात आला. या वेळी पाकिस्तानी लेखक-संपादक अजमल कमाल, समाजवादी नेते भाई वैद्य, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले आदी उपस्थित होते. 

या वेळी खान म्हणाले, ""इतर देशांपेक्षा भारतातील मुस्लिम समाज सुरक्षित असला तरीही देशात मुस्लिमांसंबंधी काही अनुचित प्रकार अलीकडे वाढले आहेत. हमीद दलवाई हे मुस्लिम धर्माच्या पुढचा विचार करत होते. त्यांच्या विचारांची समाजाला गरज आहे; पण त्यांचे विचार समजून घेण्याची मुस्लिमांची तयारी नाही.''

Web Title: Hameed Dalwai Award