दृष्टिहीन, दिव्यांगांचा विवाह थाटामाटात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 मे 2019

पुष्पमालांनी सजलेला मंडप आणि विद्युत रोषणाईचा झगमगाट... सनई-चौघडे आणि मंगलाष्टकांचे मंजूळ स्वर... वाटी चमच्यापासून ते फ्रिजपर्यंत मोठ्या हौसेने सजविलेले रुखवत... आणि अक्षतांच्या माध्यमातून शुभाशीर्वाद देण्यासाठी जमलेले वधू-वरांचे दृष्टिहीन व दिव्यांग बांधव, असे चित्र पुण्यात पाहायला मिळाले.

पुणे - पुष्पमालांनी सजलेला मंडप आणि विद्युत रोषणाईचा झगमगाट... सनई-चौघडे आणि मंगलाष्टकांचे मंजूळ स्वर... वाटी चमच्यापासून ते फ्रिजपर्यंत मोठ्या हौसेने सजविलेले रुखवत... आणि अक्षतांच्या माध्यमातून शुभाशीर्वाद देण्यासाठी जमलेले वधू-वरांचे दृष्टिहीन व दिव्यांग बांधव, असे चित्र पुण्यात पाहायला मिळाले.

निमित्त होते शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्ट, सहकारी संस्था व लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्थेतर्फे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या दृष्टिहीन व दिव्यांग मुला-मुलींच्या अनोख्या विवाहसोहळ्याचे. या वेळी वधू-वरांना 
शुभाशीर्वाद देण्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी हजेरी लावली. बीड येथील महेश सातपुते या दृष्टिहीन तरुणाचा विवाह जालना येथील सिंधू शिंदे या दृष्टिहीन तरुणीशी झाला; तर विशाल झनकर आणि सुनंदा काळे हे दोघे ही दिव्यांग आहेत. विशाल झनकर हा नाशिकचा असून सध्या तो खासगी कंपनीमध्ये नोकरी करतो; तर सुनंदा काळे ही मूळची बीडची आहे. ती एका खासगी कंपनीमध्ये काम करते. सेवा मित्र मंडळ आणि इतर गणेशोत्सव मंडळांसह पुणेकरांनी पुढाकार घेऊन लुई ब्रेल संस्थेसोबत या विवाह सोहळ्याची तयारी केली. गणेशोत्सव मंडळांतील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या मुलींचे मामा म्हणून कन्यादान केले.  

सिंधू शिंदे (दिव्यांग वधू) म्हणाली, ‘‘माझ्या घरच्यांनी जेवढे केले नसते तेवढे या सगळ्या मामांनी केले आहे. पुण्यातील बाजारपेठेत माझ्या लग्नाच्या कपडे व वस्तू खरेदीपासून मेहंदी सोहळ्यापर्यंत प्रत्येक क्षण मी खऱ्या अर्थाने जगले.’’

Web Title: Hanciapped People Marriage Motivation Initiative Ganeshotsav Mandal