अवसरी बुद्रुक परिसरातील हातपंपामुळे पाण्याचा प्रश्न सुटला 

अवसरी बुद्रुक परिसरातील हातपंपामुळे पाण्याचा प्रश्न सुटला 

पारगाव : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील खालचा शिवार परिसर व मुक्ता देवी मंदिर अशा एकुण तीन ठिकाणी पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने बोअरवेल घेऊन त्यावर हातपंप बसवल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

अवसरी बुद्रुक व मेंगडेवाडीच्या हद्दीवर असलेल्या मुक्ता देवी मंदिर परिसरात तरुणांकडुन मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे, मात्र एप्रिल व मे महिन्यात उन्हाच्या तडाख्यात सर्व झाडे पाण्याअभावी जळून जात असल्याने स्थानिक ग्रामस्थ प्रशांत चवरे, बाळासाहेब चवरे, तंटामुक्ती अध्यक्ष सर्जेराव हिंगे पाटील, कल्याण हिंगे पाटील यांनी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांच्याकडे बोअरवेलची मागणी केली होती.

या मागणीची दखल घेऊन वळसे पाटील यांनी आठ दिवसातच बोअरवेल घेण्याच्या सूचना केल्यानंतर मुक्तादेवी मंदिरासमोर बोअरवेल घेतला गेला. बोअरवेलला चांगल्या प्रकारे पाणी लागल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा व झाडांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. या ठिकाणी हातपंप बसविल्यानंतर पाणी पूजन सरपंच पवन हिले यांच्या हस्ते करण्यात आले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत वाडेकर, माणिक हिंगे पाटील, बाळासाहेब चवरे, प्रशांत चवरे, रामहरी चवरे, मयूर चवरे, पांडुरंग हिंगे पाटील उपस्थित होते. याच बरोबर खालचा शिवार या ठिकाणी पीरबाबा मंदिर व भालेराव वस्ती या ठिकाणीसुद्धा घेतलेल्या बोअरवेलला भरपूर पाणी लागल्याने वरील वस्तीचा प्राणी प्रश्न मार्गी लागल्याचे उपसरपंच सचिन हिंगे यांनी सांगीतले.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com