पाणी द्या, पाणी!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 जानेवारी 2019

पुणे - ताडीवाला रस्त्यावरील ‘आरबी-२’ कॉलनीमध्ये राहत असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी गेल्या पाच दिवसांपासून पिण्याचे पाणी मिळत नसल्याने रेल्वेच्या विभागीय कार्यालयावर सोमवारी हंडा मोर्चा काढला. त्या वेळी रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांना मागण्याचे निवेदन देत ‘आम्हाला पिण्याचे पाणी द्या,’ अशी मागणी केली. प्रशासनाने दोन दिवसांत पाणी देण्याचे आश्‍वासन दिले. 

ताडीवाला रस्त्यावरील कॉलनीमध्ये राहत असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना मागील पाच दिवसांपासून पिण्याचे पाणी मिळत नाही. महापालिकेकडून कमी दाबाने पाणी सोडले जाते. तसेच, रेल्वेची पाण्याची टाकीही खराब झालेली असल्याने या कर्मचाऱ्यांना पुरेसे पाणी मिळत नाही. जे मिळते ते पाणी पिण्यास योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वे प्रशासनाने लवकर पाण्याची व्यवस्था करावी, या मागणीसाठी हा मोर्चा काढला होता. रेल्वेच्या विभागीय कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला होता. रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी आंदोलकांनी निवेदन दिले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Handa Morcha for Water