Loksabha 2019 : पतीच्या सहकार्याने दिव्यांग पत्नीचे मतदान

Loksabha 2019 : पतीच्या सहकार्याने दिव्यांग पत्नीचे मतदान

पुणे - निसर्गाने अपंगत्व लादले म्हणून काय झाले, मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे, या उद्देशाने एका पतीने अपंग पत्नीला मतदान केंद्रापर्यंत उचलून आणून मतदान घडवून  आणले. आंबेगाव बुद्रुक येथील अभिनव शाळेतील मतदान केंद्रात आज हे चित्र पाहायला मिळाले.

मनीषा सिंग असे त्यांचे नाव आहे. त्या दोन्ही पायांनी अधू असल्याने त्यांना चालता येत नाही. त्या पती अरुण यांच्यासह आंबेगाव पठार भागात राहतात. अरुण हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नोकरी करतात. आज मतदान असल्याने ते पत्नीला मोटारसायकवर घेऊन मतदान केंद्रात आले होते. दुपारी चारच्या सुमारास त्यांनी मतदान केले. 

मतदान केंद्रात गेल्यानंतर त्या सरकत ईव्हीएम मशिनपर्यंत गेल्या. सरकारी यंत्रणेने त्यांना खुर्ची दिली. त्यांच्या पतीनेच त्यांना उचलून खुर्चीवर ठेवले आणि त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. ‘‘मतदान माझा हक्क आहे, तो बजावलाच पाहिजे. मी दुसऱ्यांदा मतदान करीत आहे,’’  अशी भावना त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com