अपंग, ज्येष्ठांना रिक्षातून मोफत प्रवास

मिलिंद संधान
शनिवार, 14 जानेवारी 2017

नवी सांगवी - समाजसेवा करायची म्हटल्यावर रग्गड पैसा, मोठ्या पदव्या आणि मानमरातब असायला हवा, असा गैरसमज असतो; परंतु या सर्वांना छेद देत दहावीपर्यंत शिकलेल्या सांगवीतील वामनराव किसन शितोळे हे गेल्या दोन वर्षांपासून अंध, अपंग, ज्येष्ठ व असाह्य लोकांना स्वतःच्या रिक्षातून मोफत प्रवास करून देत आहेत. 

त्यांचे घराणे वारकरी पंथाशी जोडले आहे. वयाच्या पंचाहत्तरीत ते पांडुरंगाचे नामस्मरण करीत सांगवी पिंपळेगुरव परिसरातील अपंगांना मदतीचा हात देत आहेत. वामनराव १९७५च्या आसपास खडकी येथील ॲम्युनेशन फॅक्‍टरीत टर्नरचे काम करीत असताना त्याच्या पायावर लोखंडाचा मोठा गोळा पडला. त्याचे परिणाम पंधरा ते वीस वर्षांनंतर जाणविले. वानवडी येथील लष्कराच्या रुग्णालयात दोन्ही पायांवर शस्त्रक्रिया करून ते गुडघ्यापर्यंत कापावे लागले. त्यानंतर जयपूर फूटचा वापर करत आहेत.

निःस्पृह आणि निष्कलंक आयुष्य जगलेले वामनरावांना शारीरिक अपंगत्व जडले असले तरी मनाने ते खंबीरच राहिले. स्वतःला फिरण्यासाठी रिक्षाची निवड केली. या रिक्षातूनच ते जन्मताच अथवा इतर कारणांनी अपंगत्व आलेल्यांना सांगवी परिसरात मोफत प्रवासी सेवा देत आहेत. 

वामनराव शितोळे म्हणाले, ‘‘मला पाच मुली असून, त्या सासरी आनंदी आहेत. मुलगा सकाळनगर येथील यशदामध्ये अधिकारी आहे. कष्टी अपंगाना मोफत प्रवास सेवा देऊन मी त्यांच्या दुःखाचा भार हलका करण्याचा प्रयत्न करतो आहे. केवळ सांगवी, पिंपळे गुरव परिसरात नाही, तर पिंपरी-चिंचवडमध्ये अपंगांना सेवा देतो. देहूरोड येथील त्यांच्या शेतावर जात येत असताना रस्त्यात थांबविणाऱ्या पादचाऱ्यालाही रिक्षात बसवून त्याला हव्या असलेल्या ठिकाणी पोचवितो.

Web Title: handicaped old people rikshaw travel free