दिव्यांग, वंचित मुलांचे ‘रंग बरसे’

पुणे - धूलिवंदनानिमित्त भोई प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘रंग बरसे’ कार्यक्रमात तरूणांसमवेत सहभागी झालेली विशेष मुले.
पुणे - धूलिवंदनानिमित्त भोई प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘रंग बरसे’ कार्यक्रमात तरूणांसमवेत सहभागी झालेली विशेष मुले.

पुणे - विविध गाण्यांच्या तालावर रंग व फुलांची उधळण करून दिव्यांग आणि वंचित मुलांनी एकमेकांना रंग लावण्याचा आनंद लुटला.

धूलिवंदनानिमित्त भोई प्रतिष्ठानने विशेष मुलांसाठी रंग बरसे कार्यक्रम आयोजिला होता. एकलव्य न्यास, स्वाधार संस्था, लुई ब्रेल अंध अपंग संस्था, महावीर निवासी मतिमंद संस्था, दीप ग्लोबल सोसायटी, दिशा इन्स्टिट्यूट, सेवाधाम वृद्धाश्रम, सूर्योदय सोशल फाउंडेशन, जिजाऊ फाउंडेशन, वंचित विकास संस्था, ज्ञानगंगोत्री मतिमंद विद्यालय, सहेली फाउंडेशन, समर्पण संस्था आदी संस्था आणि विद्यालयातील १,४०० मुले रंगोत्सवात सहभागी झाली होती, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई यांनी दिली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, कुलगुरू नितीन करमळकर, सीआयडीचे प्रमुख संजीवकुमार सिंघल, येरवडा कारागृह महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव, पोलिस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार, राष्ट्रवादीचे रोहित पवार, अभिनेते प्रवीण तरडे, देवदत्त नागे, जयमाला इनामदार सहभागी झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com