कोथरूडच्या झाला सोसायटीत दिव्यांगांचा सन्मान

झाला सोसायटी - दिव्यांगांना जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप करून शिवजयंती साजरी करण्यात आली.
झाला सोसायटी - दिव्यांगांना जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप करून शिवजयंती साजरी करण्यात आली.

पौड रस्ता - सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, कला अशा विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या दिव्यागांना उपयुक्त वस्तू, शिष्यवृत्ती, वॉकर, कुबड्या प्रदान करून रविवारी गौरविण्यात आले. निमित्त होते शिवजयंतीचे. 

एनेब्लर चॅरिटेबल ट्रस्ट आणि सक्षम पुणे महानगर या संस्थांच्या वतीने  छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहरातील विविध भागांतील दिव्यांगांचा सत्कार व गरजेच्या वस्तूंचे वाटप कोथरूड येथील झाला सोसायटीतील छत्रे सभागृहात करण्यात आले. 

या वेळी व्हीलचेअर क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करणारे रमेश सरतापे, राहुल रामुगडे, सुरेंद्र कासारे, आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू अनू चौहान, फॅशन डिझायनर प्रियांका दबडे, गडकिल्ले सर करणारा आकाश पवार, शिक्षण क्षेत्रात काम करणारे हरिदास शिंदे, सचिन गिरासे, संतोष भालेराव, साहिल शेख, मरिअप्पा आचेकरी, दत्ता लष्करे, धनराज चौधरी, बालाजी मोरे, अशोक बोत्रे आदी दिव्यांग बांधवांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला. दीपक जगताप या विशेष मुलाला कॅमेराचे साहित्य देण्यात आले.

या उपक्रमात राजे शिवराय प्रतिष्ठान कर्वेनगर, शिवभक्त प्रतिष्ठान वारजे, निरंजन सेवाभावी संस्था, महेश सेवा संघ पुणे, संस्कृती प्रतिष्ठान, पोलिस मित्र संघटना, जाणीव प्रतिष्ठान, साई गार्डन प्रतिष्ठान, बाल तरुण मंडळ, महिंद्रा चाकण मित्रपरिवार, महिंद्रा लॉजिस्टिक्‍स चाकण मित्रपरिवार, एरंडवणे नागरिक सहकारी मंडळ अशा विविध संस्थाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

संयोजन अमोल शिनगारे, मरिअप्पा आचेकरी, संतोष भालेराव, अभिजित शेडगे, अशोक बोत्रे, किशोर रासकर, रवींद्र राजपूत यांनी केले. या वेळी शामसुंदर मुंदडा, जयेश कासट, किशोर शिंदे, सनी मानकर, मनाली भिलारे, अनिल राणे, सचिन गवळी, अभिनेते रमेश परदेशी, डॉ. उत्कर्ष शिंदे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com