Coronavirus : गरजूंपर्यंत पोचले मदतीचे हात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी गरजूंपर्यंत मदत पोहचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. परराज्यातील अडकलेल्या कामगार, गरीब कुटुंबे यांना भोजन, धान्य, औषधे अशा विविध स्वरूपात ही मदत देण्यात येत आहे. 

कोरेगाव पार्क- घोरपडी प्रभागातील दहा हजार गरजू कुटुंबांना एक महिना पुरेल इतका किराणा माल नगरसेवक उमेश गायकवाड यांनी घरपोच पाठविला आहे. सिक्कीम विद्यापीठाचे कुलगुरू डी. बी. शेकटकर उपस्थित होते.

मुंढवा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी गरजूंपर्यंत मदत पोहचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. परराज्यातील अडकलेल्या कामगार, गरीब कुटुंबे यांना भोजन, धान्य, औषधे अशा विविध स्वरूपात ही मदत देण्यात येत आहे. 

कोरेगाव पार्क- घोरपडी प्रभागातील दहा हजार गरजू कुटुंबांना एक महिना पुरेल इतका किराणा माल नगरसेवक उमेश गायकवाड यांनी घरपोच पाठविला आहे. सिक्कीम विद्यापीठाचे कुलगुरू डी. बी. शेकटकर उपस्थित होते. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रेहमान फाउंडेशनची मदत
विश्रांतवाडी - रेहमान फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गरजू कुटुंबाना किराणा आणि जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात येत आहे. आतापर्यंत जवळपास दोन हजार ऐंशी कुटुंबांना फाउंडेशनच्या वतीने मदत करण्यात आली आहे.  फाऊंडेशनचे संस्थापक हज़रत मौलाना सज्जाद नोमानी यांच्यामार्फत हा विधायक उपक्रम देशभरात सुरू आहे. मौलाना साकिब, वसीम मोमीन, मौलाना अब्दुल वहिद अणि इतर सहकारी परिश्रम घेत आहेत.

पोलिसांना आयुर्वेदिक काढा 
सहकारनगर -
 पोलिस अहोरात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी काम करीत आहेत. तणावग्रस्त वातावरणात तहानभूक विसरून वेळेची मर्यादा बाजूला ठेऊन अत्यंत खंबीरपणे पोलिस बांधव कार्यरत आहेत. त्यांच्या शरीर व मनाची काळजी समाजाने घेतली पाहिजे या भावनेतून पोलिसांची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी अपूर्वा सामाजिक प्रतिष्ठानतर्फे आयुर्वेदिक काढ्याचे वाटप करण्यात आले. सहकारनगर ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार बिडवई, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुहास पाटील, कमलेश शिंदे, सतीश चव्हाण, राणी राऊत आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. सुहास शितोळे यांनी मार्गदर्शन केले. 

कामगारांना जेवण वाटप
सहकारनगर -
 तावरे कॉलनीमधील अखिल अरण्येश्वर गणपती ट्रस्ट व गणेश विचार मंच यांच्याकडून गोरगरिबांना व कामगारांना दहा दिवसापासून जेवणाचे तीनशे ते चारशे  पॅकेट वाटप करण्यात येत आहेत. सातारा रस्ता परिसरातील शंकर महाराज मठ, स्वारगेट परिसर, तळजाई पठार, कात्रज इस्काॅन मंदीर, आझम टेकडी आदी भागांमध्ये जाऊन विनामूल्य जेवन वाटप केले जात आहे. 

महापालिकेकडे मदतीचे धनादेश
प्रभात रस्त्यावरील कमला नेहरू पार्कजवळील श्री दत्तमंदिर ट्रस्टतर्फे पुणे महापालिका आयुक्तांकडे एक लाख रुपयांचा धनादेश सुपुर्द करण्यात आला. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करीत अध्यक्ष अमृतराव खिलारे, उपाध्यक्ष आंनद घैसास, सचिव नागेश करपे, खजिनदार दिलीप कर्नावट आदी उपस्थित होते. याचबरोबर मेहेंदळे गॅरेज चौकातील भैरवनाथ मंदिर ट्रस्टतर्फे पंचवीस हजार, तसेच मंदिराचे ट्रस्टी अमृतराव खिलारे यांच्यातर्फे पंचवीस हजार रुपयांचा धनादेश आयुक्तांकडे देण्यात आला.

कोंढवे धावडे येथे औषध फवारणी 
पुणे -
 कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोंढवे धावडे गावात औषध फवारणी करण्यात आली. त्याचबरोबर, नागरिकांना मोफत मास्क वाटण्यात आले. हा उपक्रम सरपंच नितीन धावडे, सचिन दोडके, उपसरपंच सुनीत लिंबोर व ग्रामपंचायत सदस्यांच्या पुढाकाराने राबविण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे खडकवासला अध्यक्ष त्रिंबक मोकाशी, रमेश धावडे, मानिक मोकाशी, अतुल धावडे, अक्षय पवार, अशोक साळुंखे, विक्रम धोंडगे, परेश मोरे आदी या वेळी उपस्थित होते.

अन्नाच्या पाकिटांचे वाटप 
सिंहगड रस्ता - तुकाईनगर येथील गरीब आणि गरजू नागरिकांना अन्नाच्या पाकिटांचे वाटप  करण्यात आले. नगरसेवक प्रसन्न जगताप यांनी यासाठी पुढाकार घेतला. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करून दिवसातून दोन वेळा ही मदत केली जात आहे. या उपक्रमासाठी किशोर कुलकर्णी, राजेंद्र जगताप, गोपाळ बाबर, सुनील मोहिते, लक्ष्मण कराड, राम कराड यांनी सहकार्य केले.

निंबजनगर येथे रक्तदान शिबिर 
सिंहगड रस्ता - सनसिटी रस्त्यावरील निंबजनगर परिसरातील विठ्ठल संकुल येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिराचे आयोजन स्वीकार देशपांडे यांनी केले होते. यात ६० हून अधिक नागरिकांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिरास रक्ताचे नाते ट्रस्टचे अध्यक्ष राम बांगड, विश्वास देशपांडे, शेखर देशपांडे यांचे विशेष सहकार्य लाभले.

५० जणांनी केले रक्तदान 
सिंहगड रस्ता - दामोदर नगर येथील  दामोदर मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ५० हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला. डॉ. मानसी पवार यांचे सहकार्य लाभले. शशितारा प्रतिष्ठानने  नागरिकांना मास्क वाटप केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hands of help reached out to the needy