‘तिच्या’साठी सरसावले ममत्वाचे शेकडो हात!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

पुणे :  चौथीही मुलगीच झाली म्हणून जन्मदात्यांनी नाकारली तरीही तिला मायेने जवळ घेणारे माणुसकीचे शेकडो हात पुढे आल्याचे शुक्रवारी दिसले. या मुलीला आम्ही दत्तक घेतो, अशी विचारणा करणारेही दूरध्वनी आले; पण या मुलीला तिच्या आई-वडिलांनी स्वीकारावे, असा आणखी एक प्रयत्न बालकल्याण समितीतर्फे करण्यात येणार आहे. 

‘जन्मदात्यांकडून मुलगी थेट अनाथालयात’ या शीर्षकाखाली ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले. चौथीही मुलगीच झाली म्हणून घराच्या उंबऱ्यातूनही आत न घेता खुद्द जन्मदात्यांनीच तिला अनाथालयाचा रस्ता दाखविण्याची खळबळजनक घटनेचे हे वृत्त होते. त्या घटनेवर प्रचंड संतापजनक प्रतिक्रिया नोंदविल्या गेल्या. त्याच वेळी या मुलीला मायेने जवळ घेण्यासाठी हातही पुढे आले; पण बालकल्याण समितीने या मुलीचा स्वीकार करण्यासाठी तिच्या आई-वडिलांना आणखी एक संधी दिली आहे. त्यासाठी या

जन्मदात्यांचे ते समुपदेशनही करणार आहेत. त्यानंतर ते मुलीचा स्वीकार करतील, असा आशावादही व्यक्त करण्यात येत आहे. या प्रतिक्रिया नोंदविताना अशोक म्हणाले, ‘‘यात आईची भूमिका ठाम असली पाहिजे. कारण, त्या स्त्रीच्या आईने असा निर्णय घेतला असता तर तिचाही जन्म झाला नसता.’’

ज्योत्स्ना ठाकूर म्हणाल्या, ‘‘मुलगा आणि मुलगी समान असे एकीकडे म्हणत असताना बघा आपली लोकं मागास बुरसटलेली आहेत, याची प्रचिती आली आहे. मुलीला चांगले शिक्षण द्यावे. तिला तिच्या पायावर उभे करावे तिची जबाबदारी तिचे लग्न झाल्यावर संपते; पण मुलाची सुनेची नातवाची जबाबदारी कायम राहते, हे विसरू नये. मुलगी धनाची पेटी असते ती भावनेला जपते, घरात कष्ट करते.’’ ही वेदनादायक घटना आहे. सामाजिकदृष्ट्या हे गंभीर असल्याचे राजन यांनी नोंदविले आहे.

जन्मदात्यांकडून मुलगी थेट अनाथालयात

Web Title: Hands for motherhood to serve her!