गर्भपातास नकार देणाऱ्या नवविवाहितेला दिली फाशी

डी. के. वळसे पाटील
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

मंचर (पुणे) : माहेरहून पैसे व दागिने आणत नाही व गर्भपातासही नकार देणाऱ्या नवविवाहितेला राहत्या घरात सासरच्या लोकांनी फाशी देवून ठार केल्याची धक्कादायक घटना पेठ (ता. आंबेगाव) येथे गुरुवारी (ता. 27) घडली. पूनम स्वप्नील ढमाले (वय 25) असे मृत्यमुखी पडलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी मंचर पोलिसांनी पूनमचा छळ करून तिचा गळा आवळून खून केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

मंचर (पुणे) : माहेरहून पैसे व दागिने आणत नाही व गर्भपातासही नकार देणाऱ्या नवविवाहितेला राहत्या घरात सासरच्या लोकांनी फाशी देवून ठार केल्याची धक्कादायक घटना पेठ (ता. आंबेगाव) येथे गुरुवारी (ता. 27) घडली. पूनम स्वप्नील ढमाले (वय 25) असे मृत्यमुखी पडलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी मंचर पोलिसांनी पूनमचा छळ करून तिचा गळा आवळून खून केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी मंचर पोलिसानी पूनमचा पती स्वप्निल भरत ढमाले, सासु संगिता भरत ढमाले, सासरे भरत ढमाले, दिर निखिल भरत ढमाले, सुमित भरत ढमाले यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना शनिवार (ता.2 9) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश घोडेगाव न्यायालयाने दिला आहे.

''पूनम हि विज्ञान शाखेची पदवीधर तर पती स्वप्नील हा बारावी शिकलेला आहे. त्याची पेठ येथे चायनीजची गाडी आहे. दोघांमध्ये प्रेम प्रकरण होते. पूनमच्या कुटुंबाचा लग्नाला विरोध होता. सात महिन्यापूर्वी दोघांनी पूनमच्या आईवडिलांचा विरोध असतानाही विवाह केला. त्यानंतर एक महिन्याने पूनमच्या आईवडिलांची सहमती मिळाल्यानंतर आळंदी येथे सर्व नातेवाईकांच्या उपस्थितीत पुन्हा विवाह केला. लग्नानंतर दोघांमध्ये भांडणे सुरु झाली. पूनमला वारंवार मारहान करून माहेरून पैसे व दागिने घेवून ये असा तगादा लावला होता. त्यासाठी तिचा मानसिक व शारीरिक छळ केला होता. तसेच पूनम तीन महिन्याची गर्भवती होती. तिच्यावर गर्भपात करण्यासाठी दबाव आणला जात होता, अशी माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.'' असे पोलिस निरीक्षक प्रदीप जाधव यांनी सांगितली.

गुरुवारी (ता. 27) सकाळी दहा वाजण्याच्या पुर्वी पूनमने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची फिर्याद मंचर पोलिस ठाण्यात ढमाले कुटुंबाने दिली होती. त्यानुसार पोलिसांनी पुढील कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरु केली होती. दरम्यानच्या काळात पुनमचे वडील शाम भिमाजी सैद (रा. महाळुंगे पडवळ, ता. आंबेगाव) यांना सदर घटना समजली ते मंचर पोलिस ठाण्यात आले. ''माझी मुलगी कधीही आत्महत्या करणार नाही. सासरच्या लोकांनी पुनमचा गळा दोरीने आवळून तिला ठार केले आहे.'' अशी फिर्याद सैद यांनी पोलिस ठाण्यात नोंदविली.

घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे यांनी भेट दिली. मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात गुरुवारी रात्री शवविचेद्न करण्यात आले. तिला फाशी दिल्याचे वैदकीय अहवालात नमूद केले आहे. मृतदेह ताब्यात मिळाल्यानंतर पूनमवर माहेरी महाळुंगे पडवळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एस एस पांचाळ करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The hanging of a newly married woman who refused to abortion