वडगावात श्री हनुमान चालिसा पठण (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

श्री सालासर हनुमान चालिसा मित्र मंडळाच्या वतीने संगीतमय हनुमान चालिसा पाठ कार्यक्रम आयोजित केला होता. प्रयेजा सिटी येथे हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात सकाळच्या ‘आय वील वोट’ या उपक्रमांतर्गत मतदान जनजागृतीसाठी  नागरिकांनी मतदान करण्याची शपथ घेतली.

सिंहगड रस्ता - श्री सालासर हनुमान चालिसा मित्र मंडळाच्या वतीने संगीतमय हनुमान चालिसा पाठ कार्यक्रम आयोजित केला होता. प्रयेजा सिटी येथे हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात सकाळच्या ‘आय वील वोट’ या उपक्रमांतर्गत मतदान जनजागृतीसाठी  नागरिकांनी मतदान करण्याची शपथ घेतली.

या वेळी कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे प्रवचन झाले. पारंपरिक वेशभूषेत सर्व भाविक सहभागी झाले होते. या मंडळाच्या वतीने शुक्रवार (ता. १९ ) पर्यंत शहरातील विविध ठिकाणी दररोज हनुमान चालिसा पठण केले जात आहे.

रविवारी (ता.२१) रोजी सकाळी ८ ते दुपारी ३ या वेळेत रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. के. ई. एम. हॉस्पिटलच्या मागे, नरपतगिरी चौकातील श्रीगाडगेबाबा धर्मशाळा येथे हे शिबिर होणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन सुधीर नागोरी, राधाकिसन भट्टड, पंकज करवा, प्रशांत राठी, प्रशांत मुंदडा, धीरज मुंदडा, सचिन जाजू, ॲड. जगदीश कचोलिया, भरत मुंदडा, अमित राठी, नीलेश सारडा, शाम झंवर आदींनी केले आहे.

Web Title: Hanuman Chalisa pathan in Vadgaon