पुण्याच्या बाजारात आलंय हनुमान फळ; एक ते दीड किलो आहे वजन

Hanuman-fruits.jpg
Hanuman-fruits.jpg

मार्केटयार्ड : चवीला आंबट गोड आणि मऊ गर, ओभड-धोबड आकाराचे असलेल्या हनुमान फळाची मार्केटयार्डात मागील महिनाभरापासून आवक सुरु आहे. ओभड-धोबड आकाराचे आणि वजनाला एक फळ १ ते दीड किलोचे असल्याने हे फळ ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. या फळाला एका किलोसाठी  ८० ते १०० रुपये भाव मिळत आहे. पुणे, मुंबई, शहर उपनगरासह गोवा आणि गुजरात राज्यातून या फळाला विशेष मागणी आहे.

मार्केट यार्ड फळबाजारात राशीन, कर्जत, नगर आदी भागातून हनुमान फळाची आवक होत आहे. आज बाजारात सुमारे ५० ते ६० क्रेट्स इतकी आवक झाली. एका फळाचे वजन हे सुमारे एक ते दीड किलो इतके आहे. या फळाला प्रतिकिलोस ८० ते १०० रूपये भाव मिळत आहे. महिनाभरापासून या फळाची आवक होत असून नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत याफळांचा हंगाम असतो, अशी माहिती मार्केट यार्डातील फळांचे व्यापारी संतोष ओसवालव यांनी दिली.

अरविंद मोरे म्हणाले, सिताफळ आणि रामफळाचे हनुमानफळ हे कॉम्बिनेशन आहे. शंभर ग्रॅमपासून दीड किलोपर्यंत एका फळाचे वजन असते. या फळात बियांचे प्रमाण कमी असते. मात्र, सीताफळासारखा याला गर नसतो. हनुमान फळाचे गर हे मऊ असतात. तसेच ते आईस्क्रिमसारखे चमच्याने खाता येते. थंडीमुळे या फळाची आवक कमी जास्त प्रमाणात होते. त्यानुसार त्यास भाव मिळत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com