इलेक्‍ट्रिक सायकलची दिव्यांगाकडून निर्मिती

hanumant-sodmise
hanumant-sodmise

पुणे - अपंगत्वावर मात करून हनुमंत भिकू सोडमिसे यांनी बॅटरीवर चालणाऱ्या तीनचाकी सायकलची निर्मिती केली. ती तीन तास चार्जिंग करून सुमारे ४५ किलोमीटर धावते. 

सोडमिसे चिखली-घरकुल येथे स्थायिक आहेत. पुणे महामेट्रोत सहायक समुपदेशक पदावर ते काम करत होते; परंतु तडकाफडकी काढल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. कामाच्या शोधार्थ फिरण्यासाठी पेट्रोलचे वाहन वापरणे त्यांना अवघड बनले होते. त्यांनी तीनचाकी सायकलचे इलेक्‍ट्रिक वाहनात रूपांतर केले. त्या सायकलला २४ वॅटच्या दोन बॅटरी बसविल्या आहेत. दोन्ही बाजूंना आरसे, छताची व्यवस्था केली. एल्बो स्टिक ठेवण्यासाठी स्टॅन्ड, डिक्कीही बसविली आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com