हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात येण्यास सुरूवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hapus Mango
हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात येण्यास सुरूवात

हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात येण्यास सुरूवात

पुणे - अक्षय तृतीया (Akshaya Tritiya) मंगळवारी (ता. 3) आहे. अक्षय तृतीयेच्या पूर्वसंधेवर हापूसला (Hapus Mango) मागणी वाढली आहे. तसेच भावही सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात येण्यास सुरूवात झाली आहे. 1 डझन आंब्याला घाऊक बाजारात दर्जानुसार 600 ते 800 रुपये भाव आहेत.

बाजारात मागील आठवड्याच्या तुलनेत दुप्पट आवक होत आहे. तयार मालही बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे हापूसच्या भावात घसरण झाली आहे. बदलत्या हवामानामुळे हापूसची आवक वाढली आहे. पाऊस पडण्याच्या शक्‍यतेने शेतकऱ्यांनी माल विक्रीस पाठविण्यास सुरूवात केली आहे. परिणामी आवक जास्त होत आहे. सोमवारी (ता. 2) येथील बाजारात तब्बल 15 ते 20 हजार पेटींची आवक झाली. ही आवक मागील आठवड्याच्या तुलनेत दुप्पट आहे. परिणामी भाव कमी झाले असल्याचे व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले.

सर्वसामान्य ग्राहकांकडून आंब्याला मागणी वाढली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. येत्या कालावधीत हापूसची आवक वाढून, भावात आणखी घट होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 4 ते 8 डझनाच्या कच्च्या हापूसच्या पेटीला 700 ते 2500 रुपये भाव मिळत असून, तयार मालास 1700 ते 3500 रुपये मोजावे लागत आहेत. 5 ते 10 डझनाच्या कच्च्या हापूसच्या पेटीस 1200 ते 1300 रुपये भाव मिळत असून, तयार मालाची विक्री 2200 ते 4 हजार रुपये भावाने होत आहे.

बाजारात चांगल्या दर्जाचे हापूस आंबे उपलब्ध आहेत. चवही चांगली आहे. भावात घसरण झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांनी आंबा खाण्याची हीच योग्य वेळ आहे.

- अरविंद मोरे, आंब्याचे व्यापारी.

करोनानंतर मार्केट यार्डात झालेली ही मोठी आवक आहे. अक्षय तृतीयेमुळे मागणीही जास्त आहे. मोठ्या पेट्यांपेक्षा एक, दोन डझनांच्या पेट्यांना नागरिकांकडून जास्त मागणी आहे.

युवराज काची, आंब्याची व्यापारी.

Web Title: Hapus Mango Begins To Reach The Masses

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :punemango
go to top