आवक वाढल्याने हापूस अावाक्यात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

पुणे - येथील बाजारात हापूस आंब्यांची आवक वाढल्यामुळे तो सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला आहे. आंब्याला मागणीही चांगली आहे. 

कर्नाटक हापूस आंब्याची सुमारे ५० हजार बॉक्‍स व पेट्या इतकी आवक झाली. कच्च्या हापूस आंब्याला प्रतिडझनाला दोनशे ते अडीचशे रुपये इतका भाव मिळाला. कोकणातील हापूस आंब्याची आवक वाढली असून, रविवारी सुमारे दहा ते बारा हजार पेटी इतकी आवक झाली. तयार आंब्याच्या प्रतिडझनाचा भाव ३०० ते ४०० रुपये इतका भाव मिळत आहे. 

तापमानात वाढल्याने फळ तयार होण्याचे प्रमाण वाढल्याने उत्पादक माल बाजारात लवकर पाठवू लागले आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कच्च्या आंब्याच्या भावात प्रति पेटीमागे २०० ते ३०० रुपयांनी घट झाली. चार ते सहा डझनांच्या पेटीला १००० ते १५०० रुपये, सहा ते आठ डझनाच्या पेटीला १५०० ते २००० रुपये हजार इतका भाव मिळाला. गेल्या आठवड्याच्या तुलनेत बाजारात तयार आंब्याचे प्रमाण कमी असून, तयार आंब्याच्या प्रति डझनाचा भाव हा त्याच्या दर्जानुसार ३०० ते ८०० रुपये इतका आहे.

परराज्यांतील लालबाग, बदाम, नाटी या आंब्याची आवक स्थिर आहे. त्यांचे प्रति किलो भाव पुढील प्रमाणे : लालबाग (२० ते ४० रुपये), बदाम ( २५ ते ४० रुपये ), नाटी ( २० ते ३० रुपये ), मल्लीका ( ३० ते ४० रुपये ), पायरी ( चार ते पाच डझन पेटी : ४०० ते ७००, प्रति किलो २५ ते ४० रुपये ). 

Web Title: Hapus mango prices less pune news