हापूस सामान्यांच्या आवाक्‍याबाहेर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

निगडी - आंब्याचा हंगाम सुरू होऊन महिना उलटला असला तरी चढ्या भावामुळे हा आंबा अजूनही सामान्यांच्या आवाक्‍याबाहेर आहे. बाजारातील आवक सध्या वाढली असली तरी भाव स्थिर आहेत. 

निगडी - आंब्याचा हंगाम सुरू होऊन महिना उलटला असला तरी चढ्या भावामुळे हा आंबा अजूनही सामान्यांच्या आवाक्‍याबाहेर आहे. बाजारातील आवक सध्या वाढली असली तरी भाव स्थिर आहेत. 

मे महिना म्हणजे आंब्याचा हंगाम. कोकणातून हापूसची आवक वाढली असली तरी अजून भाव स्थिर असल्याचे बाजारभावावरून दिसत आहे. देवगड आणि रत्नागिरी हापूसला पसंती अधिक असून या आंब्याचा भाव दर्जा आणि आकारानुसार चारशे ते सातशे रुपये डझनाला आहे. कर्नाटक व तमिळनाडू परिसरातूनही आता आंब्यांची आवक होत असून रत्नागिरी, देवगड हापूसच्या नावाखाली तो विकला जात असल्याचे चित्र आहे. यामुळे ग्राहकांची फसवणूक होत आहे. हापूसचे भाव सध्या वधारले असले तरी येत्या काही दिवसांत ते कमी होण्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. 

आवक वाढली आहे. भाव सातशे रुपये डझन आहेत. भावात थोडीफार घसरण होईल. कर्नाटक-तमिळनाडू येथून येणाऱ्या आंब्याचा दर, चव कमी आहे. ग्राहकांची कोकणातील हापूस म्हणून फसवणूक होऊ शकते. 
विष्णू कात्रे, आंबा व्यापारी, चिंचवड 

Web Title: Hapus mango rate high in Nigadi