मराठा आरक्षणासाठी एकत्र या- हार्दिक पटेल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

पुणे- आरक्षण म्हणजे भीक नव्हे, असे सांगत गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या मागणीचे समर्थन केले आहे. 
कोणत्याही परिस्थितीत आरक्षणे मिळणार असून, त्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहनही हार्दिक पटेल याने यावेळी  केले. 

पुण्यातील 'एमआयटी' संस्थेत आज (बुधवार) आयोजित कार्यक्रमात हार्दिक पटेल बोलत होते. पाटीदार आंदोलनादरम्यान देशद्रोहाच्या आरोपाखाली हार्दिक पटेल यांना अटक करण्यात आली होती.  त्याप्रकरणी सहा महिन्यांसाठी गुजरातबाहेर जाण्याच्या अटीवर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. या सहा महिन्यांदरम्यान ते राजस्थानमध्ये राहत होते. हा सहा महिन्यांचा कालावधी संपवून गुजरातमध्ये परतताच मंगळवारी त्याने गुजरातमध्ये येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर घणाघाती टीका केली. 

आरक्षणासाठी भविष्यात पुन्हा लढा उभारणार असल्याचे हार्दिक यांनी स्पष्ट केले. यावेळी त्याने महाराष्ट्रातील आरक्षणाच्या मागणीला आपला पाठिंबा आहे, असे वक्तव्य करून कोणत्याही परिस्थितीत आरक्षणे मिळणारच, असे म्हटले आहे. महाराष्ट्रातील आरक्षणाच्या मागणीला समर्थन असल्याचे त्याने जाहीरपणे सांगितले.

Web Title: hardik patel supports maratha reservation