स्वातंत्र्यसेनानी हरिभाऊ लिमये यांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

पुणे - भारतीय स्वातंत्र्यचळवळीत अमूल्य योगदान देणारे स्वातंत्र्यसेनानी, समाजवादी विचारवंत आणि नामवंत वकील हरिभाऊ लिमये (वय 90) यांचे रविवारी मध्यरात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा अतुल व मुलगी अजिता, असा परिवार आहे. 

सदाशिव पेठेतील निवासस्थानी लिमये यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरी धाव घेतली. सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

लिमये यांना लहानपणापासूनच स्वातंत्र्यचळवळीने आपल्याकडे आकर्षित केले. वडिलोपार्जित भारतीय उपचार पद्धतीमधील मसाज केंद्राचा उपयोग त्यांनी क्रांतिकारकांची तुटलेली हाडे बसवून देण्यासाठी केला. ब्रिटिशांच्या दडपशाहीला विरोध करण्यासाठी त्यांनी कोवळ्या वयातच लष्कर परिसरातील कॅपिटल, एम्पायर, वेस्टएंड या चित्रपटगृहांत बॉंबस्फोट घडवून आणण्याच्या घटनेत सक्रिय सहभाग घेतला. त्यामुळे त्यांना चार वर्षांचा तुरुंगवास झाला होता. तरीही त्यांनी साथीदारांची नावे गुप्त राखली. तुरुंगातून सुटल्यानंतर आणि स्वातंत्र्यानंतर त्यांनी कायद्याची पदवी घेऊन वकिली करण्यास प्रारंभ केला. 

महात्मा गांधी, साने गुरुजी, अच्युतराव पटवर्धन, राम मनोहर लोहिया यांच्या विचारांबरोबरच समाजवादी चळवळीचा त्यांच्यावर पगडा होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही ते आघाडीवर होते, तर आणीबाणीच्या काळात तुरुंगात डांबलेल्या कार्यकर्त्यांची सोडवणूक करण्याचे कामही त्यांनी विनामोबदला केले. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात त्यांनी शोषित, वंचितांसाठी कार्य केले. सामाजिक संस्थांना ते अखेरपर्यंत मुक्तहस्ते आर्थिक मदत करत राहिले. पटवर्धन, साने गुरुजींचे कर्तृत्वावर आधारित "अमृतपुत्र', "दारूबंदीची नशा', "कारागृहातील पथिक', "द हिलिंग टच' अशा विविध विषयांवरील त्यांची पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. 

Web Title: Haribhau Limaye dies