हॅरिस समांतर पूल महिनाभरात खुला

Haris-Bridge
Haris-Bridge

पिंपरी - पुणे-मुंबई रस्त्यावरील बोपोडी चौकात होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हॅरिस पुलानजीक बांधण्यात आलेला समांतर पूल महिन्याभरात वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्‍यता आहे. या पुलाचे काम ९० टक्‍के पूर्ण झाले असून, उर्वरित दहा टक्‍के काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. 

बोपोडीत मेट्रोचे काम सुरू झाले आहे, त्यामुळे पुण्याहून पिंपरी- चिंचवडकडे जाणाऱ्या वाहनांना बऱ्याचदा या रस्त्यावर कोंडीत अडकून पडावे लागते. मेट्रोच्या कामामुळे हॅरिस पुलावर अनेकदा वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळते. प्रामुख्याने सकाळी आणि सायंकाळी ही समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते. समांतर पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर या परिसरातील कोंडी फुटण्यास मदत होणार आहे. 

हॅरिस पुलाजवळ बांधलेल्या समांतर पुलाचे काम गेल्या वर्षी पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, या जागेत असणाऱ्या घरांच्या स्थलांतराचा प्रश्‍न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. त्यामुळे याचे काम करण्यासाठी कंत्राटदाराला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती. या पुलाच्या कामाची सुरवात २३ मे २०१६ रोजी झाली होती. तीन वर्षांच्या कालावधीत हे काम पूर्ण करण्यात आले आहे.  

समांतर पुलावरून ये-जा करणे वाहनांना सहज शक्‍य व्हावे, म्हणून याठिकाणी आठ दिवस भार चाचणी घेण्यात येणार आहे. त्यात अवजड वाहने जात असताना पूल हलतो का? रस्त्यावर कोंडी झाल्यावर कोणत्या समस्या निर्माण होतात का? याची तपासणी होणार आहे. पुलाची चाचणी घेण्यासाठी डंपर, 
ट्रक आणि अन्य वाहनांचा वापर करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com