‘हॅरिस’ रेल्वे पुलाची डागडुजी सुरू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

पिंपरी - दापोडी-बोपोडीला जोडणाऱ्या हॅरिस पुलालगत असणाऱ्या रेल्वे पुलाच्या दुरुस्तीचे काम रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे. येत्या २० दिवसांमध्ये हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी सांगितले. 

खडकीजवळील रेल्वे पुलाखाली मजबुतीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत सहा ठिकाणचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित २२ ठिकाणचे काम येत्या २० दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे. या रेल्वेच्या पुलावरून पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे, मालगाड्या, लोणावळ्याकडे जाणाऱ्या लोकलची वाहतूक होते. रेल्वे वाहतुकीमुळे या पुलाची देखभाल करणे आवश्‍यक असते. त्यामुळे हे काम हाती घेतल्याचे झंवर यांनी सांगितले.

Web Title: haris railway bridge repairing