सांगवी, पिंपळे गुरव परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव

मिलिंद संधान
सोमवार, 2 जुलै 2018

नवी सांगवी (पुणे) : सांगवी पिंपळे गुरव परिसरात मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला आहे. दिवसरात्र ही भटकी कुत्री परिसरात फिरून अस्वच्छता तर पसरवित असतातच परंतु पहाटे व रात्रीच्या वेळेस फिरणाऱ्या पादचारी व दुचाकीस्वारांच्या अंगावर अचानक धावुन जाऊन छोट्यामोठ्या अपघातांना कारणीभूत ठरतात. 

येथील कचराकुंड्या, छोटेछोटे नाष्ट्याच्या टपऱ्या, मटन, चिकणच्या दुकानदारांनी खरकटे फेकून दिल्याला अन्नावर ताव मारून बळावलेली ही कुत्री पहाटे वा रात्रीच्या वेळेत गल्ली बोळात दबा धरून बसलेली असतात. एखादे वाहण आले की अचानक त्याच्यावर धावत जाऊन जोरदार पणे भुंकून चाल करतात. मनीध्यानी नसताना अचानक कुत्र्याने केलेली चाल पहाता वाहनचालक गडबडतात आणि कित्येकदा गाडीवरून खाली पडल्याने गंभीर अपघातही घडत आहे. तर पहाटे व्यायामाच्या निमित्ताने बाहेर पडणारे काही लोक खासकरून जेष्ठ नागरिक हातात काठी घेऊनच बाहेर पडत आहे. त्यामुळे अशा मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी येथील स्थानिकां नी सकाळ च्या माध्यमातून महापालिका प्रशासनाला केली आहे.

भटक्या कुत्र्यांबरोबर पाळीव कुत्रीही डोकेदुखी होऊ पहात आहे. यांचे मालक दरोरोज सकाळ संध्याकाळ यांना मोकळे सोडुन देतात, त्यामुळे आजुबाजुचा परिसर अस्वच्छ करूनच ही कुत्री घरी परततात. त्यानंतर दिवसभर दारात साखळीने बांधुन ठेवलेले हे श्वान दुपारच्या निवांत वेळी केकाटून शेजाऱ्या पाजाऱ्यांना नकोनको करतात.

Web Title: harm of dogs in sangavi pimpale gurav