‘माऊंट कार्मेल’च्या मुख्याध्यापिकेकडून विद्यार्थिनीला अपमानास्पद वागणूक

‘माऊंट कार्मेल’च्या मुख्याध्यापिकेकडून विद्यार्थिनीला अपमानास्पद वागणूक

पुणे - कुटुंबातील तरुण मुलाच्या अचानक झालेल्या मृत्युमुळे पंधरा दिवस शाळेला सुटी घेणारी नववीतील विद्यार्थिनी आणि तिच्या पालकांना शाळेच्या मुख्याध्यापिकेने अपमानास्पद वागणूक दिल्याची घटना लुल्लानगर येथील माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये घडली. याप्रकरणी विद्यार्थिनीच्या पालकांनी शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार केली होती. 

शिक्षण उपसंचालकांनी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करून शाळा व्यवस्थापन व मुख्याध्यापकांवर कारवाईचे आदेश दिले होते; परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. उलट जिल्हा परिषदेकडे तक्रार केल्याच्या कारणावरून मुख्याध्यापिकेने विद्यार्थिनीला पुन्हा अपमानास्पद वागणूक देत आम्हाला सहकार्य करायचे नसल्यास दुसऱ्या शाळेत जाण्यास बजावले. याप्रकरणी माऊंट कार्मेल शाळा प्रशासनाशी अनेकदा संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही,  तर हा संपूर्ण प्रकार गैरसमजुतीतून झाल्याची प्रतिक्रिया शाळा प्रशासनाने पालक-शिक्षक समितीचे सदस्य संदीप शेळके यांच्यामार्फत दिली आहे.

या संदर्भात पालकांनी शिक्षण उपसंचालकांना पाठवलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, गेल्या २९ नोव्हेंबरला विद्यार्थिनीच्या घरातील तरुण मुलाच्या अचानक मृत्यू झाला होता. त्यामुळे तिला शाळेतून घरी आणण्यात आले. त्या वेळी शाळा प्रशासनाला या घटनेची तोंडी माहिती देण्यात आली होती. त्यानंतर ३० नोव्हेंबरला व्हॉट्‌स ॲपवरूनही शाळा प्रशासनाला कळविण्यात आले होते. त्या वेळी शाळेकडून त्यास प्रतिसाद देण्यात आला.

 मुलाच्या निधनानंतरचे सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर १५ दिवसांनी विद्यार्थिनी शाळेत आली; परंतु तिला शाळेकडून चांगली वागणूक मिळाली नाही. पहिल्याच दिवशी तिच्याकडून गैरहजर राहण्याबाबतचा अर्ज लिहून घेण्यात आला. त्याच्यावर स्वाक्षरीसाठी दुसऱ्या शिक्षकांकडे पाठविण्यात आले. तिथे तिला पालक शाळेत येईपर्यंत तीन तास कार्यालयाबाहेर बसविण्यात आले. तसेच शिक्षा म्हणून तिच्याकडून शंभरवेळा ‘मी पुन्हा अशी चूक करणार नाही’, असे लिहून घेण्यात आले. पालक आल्यानंतर मुख्याध्यापिका सिस्टर मरीसा यांनी त्यांची कोणतीही बाजू ऐकून न घेता उपस्थित शिक्षकांसमोर अपमानास्पद भाषा वापरून मुलीचा शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप पालकांनी अर्जात केला आहे.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी उपशिक्षण अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. पुढील दोन दिवसांत शाळेत जाऊन चौकशी करून अहवाल शिक्षण उपसंचालकांना सादर केला जाणार आहे.
- डॉ. गणपत मोरे,  शिक्षणाधिकारी (माध्यमिक),  जिल्हा परिषद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com