माजी मंत्री हर्षवर्धन पाटील मुलीसह गेले राज्यपालांच्या भेटीला, कारण... 

डॉ. संदेश शहा
Sunday, 6 September 2020

माजी सहकार व संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हा परिषद सदस्या कु. अंकिता पाटील व निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी मुंबई राज्यपाल भवन येथे त्यांची भेट घेवून त्यांचे अभिनंदन केले.

इंदापूर : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून एक वर्ष पुर्ण झाल्याबद्दल राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हा परिषद सदस्या कु. अंकिता पाटील व निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी मुंबई राज्यपाल भवन येथे त्यांची भेट घेवून त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी कोविड परिस्थितीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या परीक्षे संदर्भात व इतर विषयांवरती राज्यपाल महोदयांशी सविस्तर चर्चा करून विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या तसेच राजवर्धन पाटील यांनी युवा पिढी सक्षमीकरण याकडे राज्यपाल महोदयांचे लक्ष वेधले.

यावेळी विद्यार्थ्यांच्या सर्व समस्यांवरती लवकरच सकारात्मकतोडगा काढण्याचे तसेच युवापिढी सबलीकरणकरण्या साठी योग्य उपाययोजना करण्याचे त्यानी आश्वासन दिल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Harshvardhan Patil had a discussion with Governor Bhagat Singh Koshyari