अजित पवारांमुळे हर्षवर्धन पाटलांची राजकीय वाटचाल खडतर होणार

Harshvardhan Patil's political move will be tough due to ajit Pawar.jpg
Harshvardhan Patil's political move will be tough due to ajit Pawar.jpg

वालचंदनगर : अजित पवार यांचा भाजपच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडला. अजित पवार यांनी भाजपशी केलेल्या हातमिळवणीचा इंदापूरच्या राजकारणावर परिणाम होणार असून नुकतेच भाजपमध्ये गेलेले हर्षवर्धन पाटील यांची राजकीय वाटचाल खडतर होणार असून आमदार दत्तात्रेय भरणे यांनी भरारी घेण्याची संधी मिळणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी सकाळचे एप डाऊनलोड करा  

राष्ट्रवादीचे अजित पवार व काँग्रेसचे हर्षवर्धन पाटील यांनी आघाडीच्या सरकारमध्ये १५ वर्षे एकत्र काम केले. मात्र, दोघांच्या विळ्या भाेपळ्याचे वैर होते. हर्षवर्धन पाटील यांचे सातत्याने खच्चीकरण करण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न सुरु होता. हर्षवर्धन पाटील यांच्या राजकारणाला अजित पवार यांनीच २००९ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये खऱ्या अर्थाने सुरुंग लावला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा विरोध असतानाही दत्तात्रेय भरणे यांनी २००९ साली बंडखोरी करण्यास भाग पाडले. भरणे विधानसभेच्या निवडणूकीमध्ये पराभूत झाल्यांनतर २०१२ साली पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले.

आणखी वाचा : पवार कुटुंबात कोण काय करतंय?  

भरणे यांनी अध्यक्षपदाचे  सोने करुन इंदापूर तालुक्यामध्ये कोट्यावधी रुपयांचा निधी आणला व याच्या जोरावर २०१४ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये १९ वर्षे मंत्री असणाऱ्या हर्षवर्धन पाटलांचा पराभव करुन इतिहास निर्माण करुन अजित पवारांचे पाटील यांचा पराभव करण्याचे स्वप्न पूर्ण केले. ३० एप्रिल २०१८ला अंथुर्णेमध्ये झालेल्या शेतकरी मेळाव्यामध्ये अजित पवार यांनी ‘वाटेल ते झाले तरी इंदापूरची जागा राष्ट्रवादी सोडणार नसल्याचे जाहीर करुन आघाडी तुटली तरी चालेले’ असे वक्तव्य केले. अप्रत्यक्ष पाटील यांना ओपन चॅलेंज दिले.

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप; देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री 

२०१९ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष इंदापूरची जागा सोडणार नसल्याचे हर्षवर्धन पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर पाटील यांनी विधानसभेपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, या निवडणूकीमध्ये भरणे यांच्या पाठीशी अजित पवार खंबीरपणे उभा राहिले. हर्षवर्धन पाटील यांचा बालेकिल्ला असणाऱ्या सणसर-लासुर्णे जिल्हा गटामध्ये सुरुंग लावून या गटामधून भरणे यांना मताधिक्य मिळवून दिले.यामुळे भरणे यांचा निसटता विजय झाला.

पुण्यातील नगरसेवकांचे अजित पवारांना बळ?

निवडणूकीच्या निकालानंतर भाजपचे सरकार आल्यानंतर भाजप पाटील यांचे राजकीय पुर्नवर्सन करणार असल्याच्या चर्चा जोरदार सुरु होत्या. मात्र, आज हर्षवर्धन पाटील यांचे प्रतिस्पर्धी अजित पवार यांनीच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यामुळे हर्षवर्धन पाटील यांची राजकीय वाटचाल खडतर होणार असून आमदार दत्तात्रेय भरणे यांना राजकीय भरारी घेण्याची संधी मिळणार आहे. 

राज्याला मजबूत व स्थिर सरकार मिळाले : हर्षवर्धन पाटील 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com