दफनभुमीसाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजुर: हर्षवर्धन पाटील 

प्रा. प्रशांत चवरे
रविवार, 3 जून 2018

पाटील म्हणाले, कॉंग्रेस पक्षाच्या वतीने मुस्लीम समाजाच्या उन्न्तीसाठी हज यात्रा अनुदान, पाच टक्के आरक्षण, मौलाना अबुल कलाम महामंडळासाठी भरीव तरतुद आदी निर्णय घेतले होते परंतु सध्याच्या सरकारने ते रद्द केल्यामुळे समाजाच्या अडचणी वाढल्या आहेत. यापुढेही कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून मुस्लीम समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबध्द राहु.

भिगवण : विविधतेतून एकता व सर्वधर्म समभाव हे आपल्या देशाचे प्रमुख वैशिष्ट आहे. मुस्लीम धर्मातील रमजान, हिंदु धर्मातील दिवाळी अशा सणाच्या निमित्ताने सर्व धर्मातील बांधव एकत्र येऊन सामाजिक सलोखा निर्माण करतात ही आनंदाची बाब आहे. समाजाच्या विकासासाठी सामाजिक सलोखा आवश्यक आहे सणाच्या निमित्ताने   सामाजिक सलोखा तरुण पिढीमध्ये संक्रमित होण्यास मदत होईल असे मत राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.

येथील जामा मस्जिद येथे कॉंग्रेस पक्षाच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यता आले होते. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक निळकंठ राठोड, माजी सभापती रमेश जाधव, कॉंग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अशोक शिंदे, पंचायत समिती सदस्य संजय देहाडे, पराग जाधव, संपत बंडगर, संजय रायसोनी, सुनिल काळे, सतीश काळे, संजय चौधरी, रणजित भोंगळे, शामराव परकाळे, विठ्ठल मस्के, देवानंद शेलार, सनिल वाघ, शरद चितारे उपस्थित होते.

पाटील म्हणाले, कॉंग्रेस पक्षाच्या वतीने मुस्लीम समाजाच्या उन्न्तीसाठी हज यात्रा अनुदान, पाच टक्के आरक्षण, मौलाना अबुल कलाम महामंडळासाठी भरीव तरतुद आदी निर्णय घेतले होते परंतु सध्याच्या सरकारने ते रद्द केल्यामुळे समाजाच्या अडचणी वाढल्या आहेत. यापुढेही कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून मुस्लीम समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबध्द राहु. येथे दफनभुमीची मोठी अडचण होती त्यासाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला असुन हे काम पुर्ण करण्यासठी आवश्यक तेवढ्या निधीची तरतुद करु तसेच तातडीने मस्जिदसमोर पेव्हर ब्लॉकसाठी आवश्यक निधी देऊ. 

जावेद शेख यांनी मुस्लीम समाजाच्या विविध मागण्या मांडल्या. रमेश जाधव, अशोक शिंदे, रियाज शेख, जावेद शेख यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सिराज शेख सुत्रसंचालन सलीम सातारे यांनी केले, नौशाद मुलाणी यांनी आभार मानले.

Web Title: Harshwardhan Patil in Bhigwan