''इंदापूरमधील शेतकर्‍यावर पाण्यासाठी आंदोलने करण्याची वेळ का आली?''

राजकुमार थोरात
बुधवार, 25 एप्रिल 2018

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यावर गेल्या तीन-चार वर्षामध्ये पाण्यासाठी  आंदोलने करण्याची वेळ का आली ? याचा शेतकऱ्यांनी विचार करण्याची वेळ आली असल्याचे मत माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त करुन अप्रत्यक्षरित्या आमदार भरणे यांच्यावर पाण्याच्या प्रश्‍नावरुन निशाणा साधला.

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यावर गेल्या तीन-चार वर्षामध्ये पाण्यासाठी  आंदोलने करण्याची वेळ का आली ? याचा शेतकऱ्यांनी विचार करण्याची वेळ आली असल्याचे मत माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त करुन अप्रत्यक्षरित्या आमदार भरणे यांच्यावर पाण्याच्या प्रश्‍नावरुन निशाणा साधला.

रणगाव (ता.इंदापूर) येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजनाच्या प्रसंगी आयोजित केलेल्या कार्य्रकमामध्ये बोलत होते. यावेळी तालुक्याचे काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. कृष्णाजी यादव, नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, कर्मयोगीचे संचालक राजेंद्र गायकवाड,अर्बन बॅंकेचे संचालक सत्यशिल पाटील,माजी सभापती प्रदीप पाटील, सरपंच सुषमा रणमोडे, उपसरपंच निता तेलगे उपस्थित  होते.

यावेळी पाटील यांनी सांगितले की,तालुक्यातील नागरिकांना वीस वर्षामध्ये पाण्यासाठी अांदोलने करण्याची वेळ आली नव्हती. मात्र साडेतीन-चार वर्षामध्ये पाण्यासाठी अांदोलने करावी लागत आहेत.

तालुक्यातील शेती सुजलाम सुफलाम होती. मात्र गेल्या चार वर्षांमध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत नाही. सणसर कटमधून खडकवासल्याचे एक थेंब ही पाणी चार वर्षामध्ये मिळाले नाही.

शेतकऱ्यांच्या हक्काचे  ३.९ टीएमसी पाणी कुठे जात आहे, याचा जाब विचारण्याची गरज आहे. अर्बन बँकेचे संचालक वसंत पवार यांनी मागील तीन-चार दिवसांमध्ये पाण्यासाठी आत्महत्या केली.

शेतीसाठी पाणी मिळत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करु लागले आहेत ही बाब गंभीर आहे. निरवांगी येथे शेतकऱ्यांनी नदीपात्रामध्ये पाण्यासाठी आठ दिवस आंदोलन केले तरीही प्रशासनाने पाणी सोडले नाही.

सोमवारी (ता.२३) रोजी नदीकाठच्या शेतकऱ्यांनरी एकत्र येवून पाण्यासाठी काय तरी करा ? अशी गळ घातली आहे. सध्या धरणामध्ये मुबलक पाणी असतानाही तालुक्यातील शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी का मिळत नाही ? याचा विचार करणे गरजेचे आहे.प्रशासनातील अधिकाऱ्यावर धाक राहिला नाही, पाण्याचे आवर्तन का लांबले याचे उत्तर ही अधिकारी देता नसल्याचे पाटील यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल रणमोडे व सुत्रसंचालन संतोष साळुंके यांनी केले. 

 

शेतीच्या पाण्यासाठी हर्षवर्धन पाटलांच्या पाठीमागेे उभा रहा : अॅड. यादव
इंदापूर तालुक्यातील नागरिकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. पाण्यासाठी शेतकऱ्यावर आंदोलन करण्याची वेळ येत असून पाण्याअभावी तालुक्यातील शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले अाहे. भविष्यात पाणी आणण्याची ताकद असणाऱ्या माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पाठीशी नागरिकांनी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.

Web Title: Harshwardhan Patil criticizes Dattatray Bharne on water supply