हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेसाठी पक्षश्रेष्ठींचे निर्विवाद राजकिय पाठबळ

indapur
indapur

इंदापूर - इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इंदापूर पोलीस ठाण्यासमोरील मैदानात दि. ५ सप्टेंबर रोजी झालेल्या काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेस तालुक्यातील हजारो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित राहिल्यामुळे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना बळ मिळाले आहे. विधानसभेत हर्षवर्धन 
पाटील यांची कमी जाणवते असे म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण 
पाटील, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम, आमदार रामहरी रूपनवर व जयकुमार गोरे यांनी 
पाटील यांच्या उमेदवारीस पाठबळ दिल्याने पाटील यांना नवसंजीवनी मिळाली. त्यामुळे पाटील हे विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे 
निश्चित झाले असून जनसंघर्ष यात्रेच्या निमित्त त्यांनी विधानसभा निवडणूकीचे रणसिंग फुंकले आहे.

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी असो किंवा भारतीय जनता पक्ष, शिवसेनेचे युती सरकार असो, इंदापूर तालुक्यात काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा इतर पक्षाचा उमेदवार अशी लढत सातत्याने झाली आहे. राज्यातकोणतेही सरकार असो, हर्षवर्धन पाटील यांना मंत्रीमंडळात घेतल्याशिवाय मंत्रीमंडळ पुर्ण होत नाही अशी परिस्थिती होती. काँग्रेस, राष्ट्रवादीची लोकसभा निवडणूकीस आघाडी झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदारकीचे उमेदवारांना मते देतात, मात्र त्यानंतर विधानसभा निवडणूकीस काँग्रेस उमेदवारास विरोधी उमेदवार दिला जातो. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेहमीच अंतर्गत धुसफुस चालते. मंत्रीमंडळात १८ वर्ष विविध पदावर काम करणा-या हर्षवर्धन पाटील यांना सन २००८-९ मध्ये प्रथम दत्तात्रय भरणे यांनी आव्हान दिले. भरणे यांची राजकिय कोरी पाटी व सर्वसामान्य जनतेशी असलेला प्रभावी जनसंपर्क असताना देखील हर्षवर्धन पाटील यानी त्यांच्यावर सुमारे ८ हजार मतांनी मात केली. मात्र मताधिक्य कमी झाल्यानंतर सुध्दा हर्षवर्धन पाटील व कार्यकर्ते गाफील राहिल्याने २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत पाटील यांना पराभव पत्कारावा 
लागला.

त्यामध्ये पाटील यांचा जनसंपर्क कमी झाल्याने झालेले नकारात्मक मतदान तसेच हर्षवर्धन पाटील यांनी ज्यांना पदे दिली, त्यापैकी काहींनी वैयक्तिक स्वार्थ लक्षात घेवून केलेली वाटचाल हे देखील कारण होते. यावेळी पाटील यांना पाडल्याने दत्तात्रय भरणे राज्यात जायंट किलर ठरले. जिल्हापरिषद अध्यक्षपद कारकिर्दीत केलेली कामे दत्तात्रय भरणे यांच्या कामी आली. आप्पासाहेबजगदाळे, प्रदिपगारटकर, दशरथ माने, बाळासाहेब घोलप, अॅड. राजेंद्र तांबिले, अशोक घोगरे आदींनी भरणे यांच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावली होती. मात्र निवडणूकीत झालेला पराभव हा अपघात समजून पाटील कार्यरत राहिले. त्यानंतर नगरपरिषद, पंचायत समिती निवडणूकीत विजय संपादन करून त्यांनी त्यांचे राजकिय अस्तीत्व अबादित ठेवले. मात्र त्यांच्या इंदापूर तालुका खरेदी विक्री संघ, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर दत्तात्रय भरणे व जिल्हा बॅंकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची सत्ता आली. आमदार भरणे यांनी राज्यात सत्ता नसतानाही तालुक्यास चांगला निधी मिळवून दिला. मात्र खडकवासला तसेच निरा डाव्या कालव्याच्या पाण्याचे नियोजन व्यवस्थित न झाल्याने भरणे यांच्यावर शेतकरी नाराज आहेत. खरे पहाता त्यास पाटबंधारे विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमधून आप्पासाहेब जगदाळे यांनी आमदारकीस इच्छूक असल्याची घोषणा केल्याने भरणे यांच्यासमोर पक्षातूनच आव्हान उभे राहिले. राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती प्रविण माने यांनी देखील कामाचा धुम- धडाका लावला आहे. त्यामुळे माने हे देखील  आमदारकीच्या शर्यतीत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत एकवाक्यता न झाल्यास भरणे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीमधील नाराजांवर भाजपा शिवसेना रासपाची भिस्त आहे. राष्ट्रवादीच्या वाढत्या प्रभावामुळे काँग्रेसला मरगळ येवून कार्यकर्ते दिशाहीन झाले होते. मात्र पाटील त्यांनी राजकिय कसब पणास लावून भरणेवाडी मेळावा, एकता दौड च्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला. त्यानंतर जनसंघर्ष यात्रेस इंदापूरकरांचा मिळालेला प्रतिसाद पाहून पाटीलयांचेराजकिय वजन वाढल्याचे दिसून येत आहे. पंचायत समितीचे सभापती करणसिंह घोलप, नगराध्यक्षा अंकिता शहा, निरा भिमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकूंद शहा, इंदापूर अर्बन बॅंकेचे अध्यक्ष भरत शहा, विलास वाघमोडे, उदयसिंह पाटील, मयुरसिंह पाटील, विकास पाटील, संग्रामसिंह पाटील तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी संघटित काम केल्याने जनसंघर्ष यात्रेस मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक चुरशीची होणार असून विजयी कोण होणार याचे राजकिय अंदाज बांधणे सुरू झाले आहे. पडद्यामागचे किंगमेकर त्यामुळे कामास लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com